मोटरसायकलने फिरण्याचा आनंद हा निराळाच असतो. मायलेज, आणि आपल्या आकारामुळे तिला कुठेही नेणे सोयिस्कर ठरते. यातील अनेक बाइक्स या उच्च सीसीच्या असतात जे अधिक पावर देतात. पावरच्या बाबतीत बोलल्यास हार्ले डेव्हिडसन ही बाईक जग प्रसिद्ध आहे. भारतातही तिचा चाहते वर्ग मोठा आहे. मात्र, कंपनीने खूप आधीच भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे. मात्र, कंपनीकडून भारतात वितरणाची सोय आहे. अशात कंपनीने आपल्या एकमेव अडव्हेंचर बाइकच्या किंमतीत घट केली आहे.

हार्ले डेव्हिडसन कंपनीची पॅन अमेरिका १२५० या बाईकच्या किंमतीत मोठी घट करण्यात आली आहे. या बाइकवर ४ लाख रुपयांची सूट मिळत आहे. हार्लेची ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये येते. अधिक किंमतीमुळे या बाइकला घेण्याची इच्छा मोडलेल्या अ‍ॅडव्हेंचर प्रिय ग्राहकांना ही बाईक स्वस्तात घेण्याची मोठी संधी आहे.

(ऑगस्ट महिन्यात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची सर्वाधिक विक्री, ३७७ टक्क्यांची वार्षिक वाढ)

बाइकची किंमत

पॅन अमेरिका १२५० स्टँडर्ड आता १२.९१ लाखांत मिळत आहे. पूर्वी या व्हेरिएंटची किंमत १६.९० लाख रुपये होती. तसेच, पॅन अमेरिका १२५० स्पेशलची किंमत सूट नंतर १७.११ लाख इतकी झाली आहे. पूर्वी तिची किंमत २१.११ लाख इतकी होती. या दोन्ही बाइक २०२१ मॉडेलच्या आहेत, ज्यांचे काही मर्यादित युनिट शिल्लक आहेत.

इतक्या सीसीचे इंजन

बाईकमध्ये १२५२ सीसीचे व्ही ट्विन लिक्विड कूल इंजन देण्यात आले आहे. इंजन १५०.१९ बीएचपीचा पावर आणि १२८ एनएमचा टॉर्क जनरेट करतो. इंजनला ६ स्पिड गेअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या बाईकमध्ये २१.२ लिटरचे फ्युअल टँक आहे.

(‘या’ विशेष कारमधून नेण्यात आले राणी एलिझाबेथ २ यांचे पार्थिव, जाणून घ्या फीचर्स)

हे आहेत फीचर

पॅन अमेरिका १२५० स्पेशलमध्ये अडाप्टिव्ह लाइट, टायर प्रेशर सिस्टिम,अडाप्टिव्ह हाइट (पर्यायी), स्पोक व्हिल्स आणि सेमी अ‍ॅक्टिव्ह सस्पेन्शन सारखे फीचर देण्यात आले आहेत. बाईकचे वजन २५८ किलोग्राम इतके आहे. बाईकच्या पुढे आणि मागे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या वाहनात अँटी लाकिंग ब्रेकिंग सिस्टिम देखील आहे.

Story img Loader