Maintaining Bike chain with three easy steps : सध्या भारतात दुचाकी, चारचाकी वापरण्याचे प्रमाण भरपूर वाढले आहे. त्यामध्ये दुचाकी चालकांची संख्या जास्त आहे. तर ‘चेन’ (साखळी) हा बाईकचा एक मजबूत भाग आहे; जो बाईकचा ताण आणि टॉर्क घेतो. चेन खूप तणाव सहन करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलेली असते आणि म्हणूनच ते MotoGP बाइकसाठीही वापरली जाते. पण, तुम्ही तुमच्या बाईकच्या चेनची देखभाल करता का? नाही… पण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या बाईकच्या चेनची स्वच्छता करू शकता आणि याला फक्त २० मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल. बाईकच्या चेनची स्वछता वा काळजी कशी घ्यावी याच्या काही सोप्या टिप्स पुढीलप्रमाणे :
१. बाईकची चेन स्वछ करा –
पहिली आणि सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणजे चेन साफ करणे. तुमच्या मोटरसायकलला सेंटर स्टॅण्ड असल्यास ही एक सोपी प्रक्रिया आहे. जर सेंटर स्टॅण्ड नसेल तर तुम्हाला पॅडॉक स्टॅण्डची आवश्यकता आहे. एकदा मोटरसायकल दोन्ही स्टॅण्डवर सुरक्षित राहिल्यानंतर हळूहळू चाक फिरवत असताना तुम्ही चेन क्लीनर चेनवर फवारू शकता. पण, यावेळी इंजिन बंद असेल याची खात्री करून घ्या. हळुवारपणे क्लीनरची फवारणी करा आणि काही मिनिटे असेच राहू द्या. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हळूहळू चिखल काढण्यासाठी ब्रश वापरा. पण, लक्षात ठेवा की, ब्रश जास्त वेगात वापरल्यास ओ-रिंगला नुकसान होऊ शकते. एकदा ते पूर्ण झाल्यावर आणखी काही वेळ क्लीनर स्प्रे करा आणि नंतर कापडाने पुसून टाका. साखळी साफ करण्यासाठी तुम्ही बाजारातील उत्पादने वापरू शकता. जसे की केरोसिन किंवा डिझेल.
२. चेनची तपासणी करून तिला ॲडजेस्ट करा –
कपड्याने साखळी पुसल्यानंतर, चेन सुकण्यासाठी काही मिनिटे तसेच ठेवून द्या आणि साखळीची तपासणी करा. दुचाकीची चेन वा साखळी सैल झाली आहे का तपासा. कारण- त्यामुळे बाईकमधून आवाजही येऊ शकतो. म्हणूनच बाईकची चेन जास्त घट्ट किंवा जास्त सैल नाही ना याकडे लक्ष द्या. हे अगदी सोपे; पण महत्त्वाचे काम आहे. बाईकच्या चेनसह चाके सरळ आहेत की नाही हे पाहण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे स्विंग आर्मवर दोन्ही बाजू जुळण्यासाठी लहान मार्कर किंवा टेप वापरणे. कारण- दोन्ही बाजूंचे मोजमाप समान असणे आवश्यक आहे.
३. चेन व्यवस्थित पुसून घ्या –
बाईकची साफसफाई केल्यानंतर, त्याची चेन व्यवस्थित साफ करणे फार महत्त्वाचे आहे; जेणेकरून त्यातून पाणी पूर्णपणे काढून टाकले जाईल. मगच त्यावर वंगण लावा. त्यासाठी चाक हळूहळू फिरत राहणे आणि त्याच प्रमाणात साखळीवर वंगण घालणे हा एक चांगला मार्ग आहे. असे करण्याने वंगण संपूर्ण साखळीला व्यवस्थित लागेल. संपूर्ण साखळीला वंगण लागल्यानंतर चाक आणखी दोन-चार वेळा फिरवा. या कृतीने चाक संपूर्ण साखळीशी व्यवस्थित जोडले जाईल आणि तुमची बाईक तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुन्हा सज्ज होईल. जुन्या काळातील आणखी एक हॅक म्हणजे साखळीला वंगण घालण्यासाठी गिअर-बॉक्स तेल वापरणे.