Bike emergency indicators: बाईकर्स अनेकदा त्यांच्या इमर्जन्सी इंडिकेटर्सकडे दुर्लक्ष करतात. जशी वेळोवेळी तुम्ही बाईकच्या इतर गोष्टींची काळजी घेता, तशीच बाईक चालवताना इमर्जन्सी इंडिकेटर्सची माहिती घेणंही खूप गरजेचं आहे. कारण- ही संकेत तुम्हाला बाईकमधील समस्येची माहिती देतात. जर हे संकेत स्पीडोमीटरवर ब्लिंक करीत असतील, तर तुम्ही ताबडतोब सावध होणे गरजेचे आहे.

तुमच्या माहितीसाठी काही मुख्य आपत्कालीन निर्देशक खाली दिले आहेत:

इंजिन वॉर्निंग लाइट (Engine Warning Light) : बाईकच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यास हा इंडिकेटर ब्लिंक होतो. जर हा इंडिकेटर सतत ब्लिंक होत असेल, तर दुचाकी ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये नेली पाहिजे.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत

ऑईल प्रेशर वॉर्निंग (Oil Pressure Warning) : हा सिग्नल इंजिनमध्ये ऑईलचे प्रमाण कमी असल्याचे किंवा प्रेशर योग्य नसल्याचे सूचित करतो. अशा परिस्थितीत तुम्ही बाईक थांबवून लगेच ऑईल चेक केले पाहिजे.

हेही वाचा… Kia launches Sonet Gravity: गणेशोत्सवात कार घ्यायचीय? KIAने केली सोनेट ग्रॅव्हिटी लॉंच, किंमत वाचून व्हाल थक्क

टेम्परेचर वॉर्निंग लाइट (Temperature Warning Light) : जेव्हा इंजिनचे तापमान सामान्य तापमानापेक्षा वाढते तेव्हा ही लाईट ब्लिंक होते. तापमान वाढल्याने इंजिन जास्त गरम होऊ शकते, त्यामुळे बाईक थंड होऊ द्या आणि नंतर ती वापरा.

बॅटरी वॉर्निंग लाइट (Battery Warning Light) : हा संकेत बॅटरी चार्जिंगशी संबंधित समस्या सूचित करतो. जर बॅटरी चार्ज होत नसेल, तर तुमची बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये नेणे आवश्यक आहे.

हेही वाचा… सणासुदीत स्वस्तात कार घ्यायचीय? Maruti Suzukiच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, किंमत वाचून व्हाल थक्क

टायर प्रेशर वॉर्निंग (Tire Pressure Warning) : टायर प्रेशर वॉर्निंग हे फीचर काही नवीन बाइक्समध्ये उपलब्ध आहे, जे टायरमधील हवेच्या दाबावर लक्ष ठेवते. जर दाब कमी असेल, तर हा निर्देशक ब्लिंक करतो.

ब्रेक वॉर्निंग लाइट (Brake Warning Light) : ही वॉर्निंग लाइट म्हणजे ब्रेक सिस्टीममधील बिघाड झाल्याचा संकेत आहे. अशा परिस्थितीत बाईक चालवणे सुरक्षित नसून, त्याची त्वरित सर्व्हिसिंग करावी.

हेही वाचा… Royal Enfield प्रेमींसाठी खुशखबर! तुमची आवडती Classic 350 नव्या लूकसह झाली लॉंच; किंमत एकदा पाहाच

दुचाकी चालकांनी या आपत्कालीन संकेतांकडे (Bike emergency indicators) योग्य वेळी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण- आपल्या सुरक्षिततेसाठी ते खूप गरजेचे आहे.

Story img Loader