Bike Care: पावसाळ्याच्या दिवसात अनेक जण विकेंडला मित्रांबरोबर बाईकवरून कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करतात. पण, बऱ्याचदा घरातून निघताना तुमची बाईक काही केल्या सुरूच होत नाही, ज्यामुळे तुमची चिडचिड होते. परंतु, जेव्हा असं काही घडतं, तेव्हा चिडचिड न करता किंवा न घाबरता शांत राहून आणि बाईकच्या काही किरकोळ तपासण्या करून ही समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा.
बाईक सुरू होत नसल्यास टिप्स
इंधन तपासा
जेव्हा तुमची इंधन पातळी कमी होते, तेव्हा गेज वापरून त्याची उपलब्धता तपासणे खूप कठीण असते आणि हेच तुमची बाईक सुरू न होण्यामागचे कारण असू शकते. अशावेळी तुमच्या बाईकमध्ये इंधन आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही काही जुन्या तंत्रांचा वापर करू शकता. मुख्य स्टँडवर असताना तुमची बाईक हलक्या हाताने हलवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाइल फोनचे फ्लॅशलाइट वापरूनदेखील ते तपासू शकता.
क्लच व्यवस्थित लागत नाही
बाईक सुरू करत असताना आणि ट्रान्समिशन गियरमध्ये असताना, तुम्हाला क्लच लीव्हर योग्य पद्धतीने खेचणे आवश्यक आहे. कधीकधी, क्लच योग्य पद्धतीने लागत नाही आणि त्यामुळे गाडी सुरू करण्यास वेळ लागतो.
हवेच्या दाबाची कमतरता
बाईकच्या टायरमध्ये हवेचा दाब योग्य नसेल तर बाईकला ही समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाईक चेनला चांगल्या दर्जाचे वंगण आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.
लूज स्पार्क प्लग वायर
बाईक चालकांसाठी लूज स्पार्क प्लग वायर ही नवीन गोष्ट नाही, या समस्येसाठी तुम्हाला कोणत्याही मेकॅनिकला बोलावण्याची गरज नाही. फक्त कनेक्टर अनप्लग करा आणि पुन्हा प्लग करा आणि बाईक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा.
चुकीच्या तेलाचा वापर
अनेकदा काही लोक पैसे वाचवण्यासाठी बाईकमध्ये चुकीचे तेल वापरतात, त्यामुळे बाईक मॅन्युअलमध्ये शिफारस केलेले ग्रेड आणि तेलाचा प्रकार करावा.
हेही वाचा: प्रवासादरम्यान गाडी चालवताना अचानक वादळ आल्यास काय कराल? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
इंजिन कटऑफ स्विच
अनेक जण बहुतेक वेळा बाईक बंद करण्यासाठी इंजिन किल किंवा कटऑफ स्विचऐवजी इग्निशन की वापरतात. म्हणून जेव्हा ते हे वापरतात, तेव्हा कधीकधी स्विच बंद करणे विसरतात.