Bike servicing at home: बाईकची सर्व्हिसिंग करताना लागतेय खिशाला कात्री? पण, जर तुम्हाला हे कळलं की तुम्ही पैसे वाचवून चक्क घरच्या घरीच तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग करू शकता, तर तुम्हाला विश्वास बसेल का? खरंतर हे सहज शक्य आहे.

घरीच बाईकची सर्व्हिसिंग केल्याने तुम्ही केवळ पैसेच वाचवू शकत नाही तर तुमच्या बाईकचा परफॉर्मन्स आणि मायलेजदेखील सुधारू शकता. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमची बाईक अगदी टापटीप ठेवू शकता आणि तिची चांगली काळजी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही बाईकची सर्व्हिसिंग कशी करू शकाल.

हेही वाचा… Triumph Speed ​​T4 झाली भारतात लॉंच; हाय-टेक फिचर्ससह देणार दमदार परफॉर्मन्स, किंमत फक्त…

१. इंजिन ऑईल बदला (Change Engine Oil)

ऑईल चेक करा : बाईकच्या इंजिन ऑईलची गुणवत्ता नियमितपणे तपासा. जर ऑईल घट्ट आणि घाण झाले असेल तर ते बदला.

ऑईल बदलण्याची प्रक्रिया : काही वेळ बाईक सुरू करा, जेणेकरून ऑईल गरम होईल; नंतर ऑईलचा ड्रेन नट उघडून त्यातील जुने ऑईल काढून टाका आणि नवीन ऑईल घाला.

ऑईल नियमितपणे बदला : साधारणपणे दर २,०००-३,००० किलोमीटरवर इंजिन ऑईल बदला. यामुळे इंजिनची कार्यक्षमता आणि मायलेज दोन्ही सुधारेल.

२. एअर फिल्टर साफ करा (Clean Air Filter)

एअर फिल्टर साफ करणे : बाईकचा एअर फिल्टर धुळीने भरलेला असू शकतो, ज्यामुळे इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही. दर २,०००-३,००० किलोमीटर अंतरावर एअर फिल्टर स्वच्छ करा किंवा आवश्यक असल्यास बदला.

कृती : एअर फिल्टर काढा आणि हवा देऊन त्याला स्वच्छ करा किंवा पाण्याने हलके धुवून चांगले कोरडे होऊ द्या, मग त्याला पुन्हा लावून टाका.

३. स्पार्क प्लग तपासा (Check Spark Plug)

स्पार्क प्लगची स्थिती : स्पार्क प्लग योग्यरित्या काम करत आहे की नाही ते तपासा. जर स्पार्क प्लग खराब झाले असेल तर बदला.

स्पार्क प्लग कसे कराल साफ : स्पार्क प्लग काढून ते स्वच्छ करा. नवीन स्पार्क प्लग लावल्याने इंधन कार्यक्षमता सुधारते.

४. टायर प्रेशर तपासा (Check Tyre Pressure)

टायरचा योग्य दाब : टायरचा दाब नियमितपणे तपासा आणि तो योग्य त्या पातळीवर ठेवा. उच्च किंवा कमी दाब टायरच्या पकड आणि मायलेजवर परिणाम करू शकतो.

रोटेशन आणि अलाइनमेंट : टायर्सची स्थितीदेखील तपासा, ते जास्त प्रमाणात घासले तर जात नाहीत हे तपासा. लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी टायरची अलाइनमेंट चेक करा.

हेही वाचा… Maruti Swift CNG vs Tata Tiago CNG: कोणती हॅचबॅक कार आहे सर्वात बेस्ट? जाणून घ्या किंमत, फिचर्स अन् बरंच काही…

५. ब्रेक आणि क्लच अ‍ॅडजेस्ट करा (Adjust Brake and Clutch)

ब्रेकची स्थिती : ब्रेक्स नीट काम करतात का ते नियमितपणे तपासा. ब्रेक पॅड किंवा ब्रेक शूज घासले गेले असतील तर ते बदला.

क्लच ॲडजेस्ट करा : जर क्लच खूप घट्ट किंवा सैल वाटत असेल तर ते योग्यरित्या ॲडजेस्ट करा. यामुळे गिअर्स बदलणे सोपे होईल आणि बाईकचा स्मूथनेस कायम राहील.

६. साखळी साफ करणे आणि लुब्रिकेशन (Clean the chain and Lubrication)

साखळी साफ करा : साखळीतील धूळ आणि ग्रीस काढून टाकण्यासाठी ब्रश आणि डिटर्जंट वापरा.

लुब्रिकेशन : साफ केल्यानंतर साखळीवर चेन ल्युब किंवा ग्रीस लावा, जेणेकरून बाईक सुरळीत चालेल आणि घर्षण कमी होईल. यामुळे इंजिनवरील दबाव कमी होईल आणि मायलेज सुधारेल.

७. बॅटरी आणि लाईट्स तपासा (Check Battery And Lights)

बॅटरी मेंटेनन्स : बॅटरी टर्मिनल्सवर साचलेली घाण साफ करा. बॅटरी कमी होत असल्यास ती चार्ज करा किंवा आवश्यक असल्यास बदला.

लाईट्स आणि इंडिकेटर : हेडलाइट्स, टेललाइट्स आणि इंडिकेटर व्यवस्थित काम करत आहेत का ते तपासा. खराब झालेले बल्ब बदला.

८. इंधन सिस्टीम तपासा (Check Fuel System)

इंधन फिल्टर साफ करा : इंधन फिल्टरमध्ये घाण जमा होऊ शकते, ज्यामुळे इंधनाचा प्रवाह अवरोधित होतो, त्यामुळे ते स्वच्छ करा किंवा बदला.

इंधन टाकी साफ करणे : टाकीच्या आत घाण किंवा पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. टाकी साफ केल्याने इंधनाची गुणवत्ता कायम राहते आणि मायलेज सुधारते.