BMW CE 02 India Launch Date Revealed: BMW या कंपनीचे नाव ऐकले नसेल, अशी एकही व्यक्ती नाही. BMW ही एक लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे, जी आपल्या कारची केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात विक्री करते. हीच बीएमडब्ल्यू कंपनी लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून BMW CE 02 लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही दुचाकी कधी लाँच होणार? किंमत काय असेल आणि तिच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

BMW CE 02 कधी होणार लाँच

मीडिया रिपोर्ट्सनुसार, BMW CE 02 ही स्कूटर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केली जाऊ शकते.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझरनुसार, त्याची डिझान सामान्य इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा खूपच वेगळी असेल. याची डिझाइन कंपनीने ऑगस्ट २०२४ मध्ये लाँच केलेल्या CE 04 सारखी दिली जाऊ शकते. पण, त्याला टक्कर देण्यासाठी नव्या स्कूटरमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. कंपनीने फक्त त्यांचा टीझर रिलीज करण्याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, अशी अपेक्षा आहे की, त्यातील मोटर सुमारे १५ हॉर्स पॉवर देईल आणि त्यातील बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे ९० ते १०० किलोमीटरची रेंज देईल. ही स्कूटर बेल्ट ड्राइव्ह तंत्रज्ञानावर चालणार आहे.

हेही वाचा >>स्वस्त किंमत आणि मस्त फीचर्ससह यामाहा रे ZR स्ट्रीट रॅली स्कूटर लाँच; किंमत ९८ हजार रुपयांपासून सुरू

असे असू शकतात फिचर्स आणि किंमत

अपेक्षा आहे की, बीएमडब्ल्यू आपल्या नवीन स्कूटरमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देईल. ही स्कूटर १४ इंच टायरसह प्रदान केली जाऊ शकते. त्यासोबतच यात फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स, ABS, रायडिंगसाठी मल्टिपल मोड, एलईडी हेडलाइट, रिव्हर्स गियर, की-लेस राईड, ३.५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्लॅश रायडिंग मोड, टाईप सी चार्जिंग पोर्ट, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, USD आहे. याचे फीचर्स आणि किंमत याविषयी कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. तरीही लाँचिंगपूर्वीच त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. लाँचच्या वेळी स्कूटरची अपेक्षित किंमत पाच ते सात लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmw ce 02 india launch date revealed bmw launch new electric scooter ce 02 in october 2024 check price features srk