BMW First Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, कंपन्या नवनवीन गाड्या मार्केटमध्ये आणत आहे. त्यामुळे तुम्ही नवीन Electric Scooter खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर थोडे थांबा. पुढच्या महिन्यात तुमच्यासाठी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. BMW आता आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (BMW CE 04) भारतीय बाजारात लाँच करणार आहे. ही स्कूटर जबरदस्त लूकसह बाजारात येणार आहे. ही स्कूटर २४ जुलै रोजी लाँच होणार आहे. हे इलेक्ट्रिक वाहन भारतीय बाजारपेठेत त्याच्या वैशिष्ट्यांसह दाखल होणार आहे.

एका चार्जमध्ये १३० किमी जाणार

Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 kartik aaryan starr movie lead over ajay devgn starr movie on third saturday
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

BMW च्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ८.९ kWh चा बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे की, या बॅटरी पॅकमुळे ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये १३० किलोमीटर अंतर कापू शकते. ही स्कूटर ३१ kW टॉर्क जनरेट करते; ज्यामुळे ही स्कूटर फक्त २.६ सेकंदांत ० ते ५० किमी प्रतितास वेग पकडू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड २० किमी प्रतितास आहे.

किंमत किती असेल?

BMW ने C 400 GT बाजारात लाँच केली होती; ज्याची एक्स-शोरूम किंमत ११.२० लाख रुपये आहे. कंपनी भारतीय बाजारात CE 04 ला दुप्पट किमतीत आणू शकते. कंपनीने या EV चे मुख्य तपशील शेअर केलेले नाहीत. वाहनाशी संबंधित सर्व माहिती लाँचिंगच्या वेळीच समोर येऊ शकते. ही स्कूटर अनेक आलिशान फीचर्ससह बाजारात येऊ शकते.

हेही वाचा >>पावसाळ्यात सुरक्षित वाहन चालविण्यासाठी फॉलो करा फक्त ‘या’ पाच टिप्स; अपघात होण्याची चिंता नाही

काय आहेत वैशिष्ट्ये

BMW CE 04 मध्ये अनेक फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्कूटरमध्ये तीन राइड मोड देण्यात आले आहेत. तसेच या इलेक्ट्रिक वाहनात ट्रॅक्शन कंट्रोल आणि एबीएसचे वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय नेव्हिगेशनसाठी ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीच्या वैशिष्ट्यासह या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये TFT डिस्प्लेदेखील उपलब्ध आहे.