बीएमडब्ल्यू ही एक लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे, जी आपल्या गाड्यांची भारतातच नव्हे तर जगभरात विक्री करते. तर आता बीएमडब्ल्यू कंपनी ग्राहकांसाठी खास दोन नव्या बाईक घेऊन येत आहे. यापूर्वी त्यांनी या बाईक लाँच केल्या होत्या, पण आता पुन्हा नव्या रूपात या बाईक्स ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएमडब्ल्यूने २०२४ साठी आर १२ आणि आर १२२ नाईन टी (R 12) आणि (R 12 nineT) मोटारसायकल सादर केल्या आहेत, ज्यात फ्रेम आणि मेकॅनिकल कंपोनंट अपडेटेड आहे. सगळ्यात आधी या बाईक २०१३ मध्ये प्रथम लाँच करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा कंपनी या बाईक अनोख्या रूपात ग्राहकांसाठी घेऊन येत आहे.

डिझाइन :

२०२४ साठी बीएमडब्ल्यूने दोन बाईक सादर केल्या आहेत, ज्याचे नाव आर १२ क्रुझर आणि आर १२ नाईन टी रोडरोस्टर आहे. दोन्ही बाईक पुन्हा एकदा नव्या ‘ट्यूबलर ब्रिज स्टील स्पेस’ फिचरसह विकसित करण्यात आल्या आहेत. तसेच आधीच्या मॉडेलच्या तुलनेत हे डिझाइन थोडे वेगळे आहे. तसेच बाईकला बोल्ट-ऑन ट्यूबलर स्टील रिअर सबफ्रेमदेखील मिळते आहे.

हेही वाचा…रस्त्यावर बजाजची ‘ही’ स्वस्त बाईक धावणार नाही; खरेदीसाठी व्हायची मोठी गर्दी, आता ग्राहकांकडे कोणता पर्याय?

फिचर्स :

या दोन्ही बाईकमध्ये यूएसडी (USD) फोर्क्स , रेडियली माउंटेड 4-पिस्टन मोनोब्लॉक ब्रेक कॅलिपर, एलईडी लाईट्स आणि बरेच काही फिचर्स आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स फ्रंटवर, आर १२ (R 12 ) रेंजला ड्युअल-चॅनल एबीएस (ABS), राइडिंग मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, की-लेस स्टार्ट अँड गो, यूएसबी-सी (USB-C) आणि १२ वी (12 V) सॉकेट्स, डिजिटल डिस्प्ले आणि बरेच काही फिचर्स मिळणार आहेत.

पॉवरट्रेन:

आर १२ आणि आर १२२ नाईन टी बाईक्स 1,170cc एअर आणि ऑइल-कूल्ड बॉक्सर ट्विन इंजिन आहेत. आर १२ (R 12) वरील इंजिन ९५ हॉर्स पॉवर आणि ११० एनएम (110Nm) टॉर्क बनवते, तर आर १२ नाईन टी (R 12 nineT) १०९ हॉर्स पॉवर आणि ११५ एनएम टॉर्क निर्माण करते. बीएमडब्ल्यूने एअर बॉक्समध्येदेखील बदल केला आहे, जो बाईकच्या सीटखाली इंटिग्रेटेड झाला आहे.