BMW India द्वारे भारतामध्ये BMW M2 सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. या नव्या ऑल न्यू M2 च्या किंमतीबाबतची माहिती देखील कंपनीने प्रसिद्ध केली आहे. त्या माहितीनुसार, आपल्या देशात M2 मॉडेलची किंमत (एक्स शोरुम किंमत) ९८ लाख रुपये असणार आहे. या टू-डोअर हाय-परफॉर्मन्स स्पोर्ट्स कारच्या बुकिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. लवकरच त्यांची डिलिव्हरी देखील होऊ शकते असे म्हटले जात आहे. BMW M2 कार मॉडेलची किंमत व्हेरिएंटनुसार ठरते.

Financial Express ने दिलेल्या माहितीनुसार, ऑल-न्यू BMW M2 च्या पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटची एक्स शोरुममधील किंमत ९८ लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच अधिकचे १ लाख रुपये भरुन कोणीही ऑपशनल मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटची मालकी मिळवू शकणार आहे. असे केल्याने कारची किंमत ९९ लाख रुपये इतकी होईल. BMW M2 ही कार भारतामध्ये CBU (completely built unit) म्हणून आयात केली जाते.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
NHSRCL is working on Mumbai Ahmedabad bullet train project
बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
(फोटो सौजन्य – Financial Express)

BMW M2: इंजिन आणि गिअरबॉक्स

BMW M2 सेकंद जनरेशन मॉडेलमध्ये 3.0 लीटर, ट्विन-टर्बोचार्ज, 6-सिलेंडर इन-लाइन पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनमुळे 453 bhp आणि 550 Nm पीक टॉर्क देते. हे इंजिन कारमधील 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. BMW ची ही नवी स्पोर्ट्स कार 0 ते 100 kmph वेगात ४.१ सेकंद (AT) आणि ४.३ सेकंद (MT) मध्ये धावू शकते. या कारची टॉप स्पीड 250 kmph (लिमिटेड) आहे.

आणखी वाचा – कार बाईकसाठी बेस्ट काय, नॉर्मल पेट्रोल की पॉवर पेट्रोल? फरक काय व तुम्ही कशामुळे पैसे वाचवू शकता

BMW M2: डिझाइन आणि फीचर्स

BMW M2 ही दोन दरवाजे, चार सीट्स असलेली हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्स कार आहे. या कारमद्ये स्पोर्टी डिझाइनचा प्रभाव पाहायला मिळतो. ही कार अल्पाइन व्हाईट, एम झंडवूर्ट ब्लू, ब्रुकलिन ग्रे, ब्लॅक सॅफायर आणि टोरंटो रेड अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या आतमध्ये 12.3 इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेटेस्ट BMW iDrive OS8, 14.9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि हेड-अप डिस्प्ले अशा सुविधा पाहायला मिळतात.

Story img Loader