भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात एक एक करत चारचाकी गाड्या लाँच होत आहेत. ग्राहकांची बाजारातील मागणी पाहता कंपन्यांनी उत्पादन क्षमतादेखील वाढवली आहे. ऑडी, जग्वॉर आणि मर्सिडिजने नुकत्याच आपल्या इलेक्ट्रिक कार लाँच केल्या. आता बीएमडब्ल्यू आपली गाडी लाँच करणार आहे. २४ फेब्रुवारील देशात पहिली इलेक्ट्रिक मिनी ३ डोअर कूपर एसई लाँच करणार आहे. यापूर्वी बाजारात आयएक्स इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली होती. देशात लक्झरी इलेक्ट्रिक सेगमेंट हळूहळू वेग घेत असताना देखील लक्झरी स्पेसमधील खरेदीदारांच्या विशिष्ट गटाला इलेक्ट्रिक मिनीच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचं ध्येय आहे. २०२० मध्ये जागतिक स्तरावर लाँच झालेल्या इलेक्ट्रिक मिनी ३-डोर कूपर एसईमध्ये ३२.६ kWh क्षमतेची बॅटरी वापरली गेली आहे. एका चार्जवर २७० किमीची रेंज देते. हे १८४ एचपी आणि २७० एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन ७.३ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग पकडण्यास मदत करते. लाँच केल्यावर ही गाडी व्हाइट सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक, मूनवॉक ग्रे आणि ब्रिटिश रेसिंग ग्रीनमध्ये उपलब्ध असेल.
इलेक्ट्रिक मिनीसाठी प्री-बुकिंग गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती. बीएमडब्ल्यूने पुष्टी केली की आहे की, इव्हीचे पहिले ३० युनिट्स बुक झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जेव्हा मिनी लॉन्च होईल तेव्हा ती देशातील सर्वात किफायतशीर लक्झरी इलेक्ट्रिक कार असू शकते. ज्याची किंमत सुमारे ५० लाख (एक्स-शोरूम) निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
Renault Triber एमपीव्हीने भारतात एक लाख विक्रीचा टप्पा गाठला, नवीन व्हेरियंट लाँच
इलेक्ट्रिक मिनीमध्ये १७ इंचाचे अलॉय व्हील टायर आणि केबिनमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये मिळतील. यामध्ये ८.८ -इंचाचा मुख्य डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि नप्पा लेदर अपहोल्स्ट्री वैशिष्ट्यांचा समावेश आहे.