BMW एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने भारतात आपले एक नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे कंपनीने लॉन्च केले मॉडेल हे इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. BMW ने iX1 xDrive30 एसयूव्ही हे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले आहे. iX1 मॉडेल हे X १ वर आधारित असे मॉडेल आहे. जे आर्थिक वर्षे २०२३ मध्ये सर्वात जास्त विक्री होणारी लक्झरी एसयूव्ही आहे. बीएमडब्ल्यू कंपनीने भारतात लॉन्च केलेल्या नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या फीचर्सबद्दल , किंमतीबद्दल आणि इंजिन व स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
BMW iX1 : एक्सटेरिअर आणि इंटेरिअर
बीएमडब्ल्यू iX1 मध्ये X1 प्रमाणेच इंजिनचे डिझाइन देण्यात आले आहे. या मॉडेलला ICE वाहांपेक्षा वेगळे दर्शवण्यासाठी याच्या फ्रंट ग्रीलवर ‘i’ असे चिन्ह देण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही १८ इंचाच्या अलॉय व्हील्सवर धावते. यामध्ये अनुकूल असे सस्पेंशन मिळते. हे मॉडेल ग्रे, सिल्व्हर, ब्लॅक आणि व्हाइट या चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. याबाबतचे वृत्त autocarindia ने दिले आहे.
या मॉडेलच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १०.७ इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट देण्यात आले आहे. जे बीएमडब्ल्यूच्या iDrive ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करून ऑपरेट होते. तसेच यात १०.२५ इंचाचा इन्फॉर्मेशन डिस्प्ले देखील मिळतो. या मॉडेलचे इंटेरिअर क्रोम हायलाइट अॅक्सेंटसह अॅल्युमिनिअम ‘मेशेफेक्ट’ मध्ये तयार करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना ४९० लिटरचा बूट स्पेस मिळतो.
BMW iX1: फीचर्स
बीएमडब्ल्यू iX1 मध्ये टू-झोन क्लायमेट कंट्रोल, मसाज फंक्शनसह फ्रंट सीट्स, १२ स्पीकरसह हरमन साउंड सिस्टीम, ६ अॅम्बियंट लायटिंग मोड आणि एक पॅनारॉमिक सनरूफ मिळते. तसेच या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये एलईडी हेडलाइट्स , ऑटोमॅटिक टेलगेट ऑपरेशन आणि पार्किंग असिस्ट असे फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत. iX1 मध्ये ABS, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ADAS सारखी सेफ्टी फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. हे इलेक्ट्रिक वाहन असल्यामुळे यामध्ये इंजिनचा आवाज नाही आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहन धावत असताना लोकांना संवाद करण्यासाठी कृत्रिम ध्वनी वाजेल असे फिचर यात देण्यात आले आहे. जे केवळ ३० किमी प्रतितास या स्पीडवर काम करते.
इंजिन आणि परफॉर्मन्स
BMW iX1 मध्ये ऑल व्हील ड्राइव्हची क्षमता मिळणार आहे. यामधील बॅटरी ३१३ एचपी पॉवर आणि ४९ एनएम जनरेट करते. ज्यामुळे हे इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल ५. ६ सेकंदांत ० ते १०० किमी पतितासी इतका स्पीड पकडू शकते. तसेच यामध्ये १८० किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देण्यात आला आहे. तसेच कंपनीने यामध्ये ६६.४ kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. एका चार्जमध्ये ही ईव्ही कार ४४० किमी धावते असा दावा करण्यात आला आहे. कारमधील बॅटरी ६.३ तासांमध्ये ० ते १०० टक्के चार्ज होऊ शकते. तर १३० KW DC फास्ट चार्जर फक्त २९ मिनिटांमध्ये बॅटरी १० ते ८० टक्के चार्ज करतो.
किंमत आणि स्पर्धा
iX1 xDrive 30 ही बीएमडब्ल्यूची देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने हे इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल ६६.९० लाख (एक्सशोरूम) रुपयांच्या किंमतीत लॉन्च केले आहे. बीएमडब्ल्यू iX1 मर्सिडीज EQB आणि Volvo XC40 या वाहनांशी स्पर्धा करेल. तसेच ह्युंदाई Ioniq 5 आणि किआ EV6 या वाहनांना देखील बीएमडब्ल्यूचे हे नवीन मॉडेल टक्कर देणार आहे.