2023 BMW M 1000 RR Launch in India: BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत नुकतीच आपली नवीन M 1000 RR बाईक लाँच केले आहे. BMW ही बाईक CBU (Completely Built Up Units) मार्गाने भारतीय बाजारपेठेत विकणार आहे, जी भारतीय बाजारपेठेत कंपनीचे प्रमुख मॉडेल असेल. या बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे, तर नोव्हेंबरमध्ये डिलिव्हरी केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बाईकचा बेस व्हेरियंट दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल, जो लाइट व्हाइट आणि एम मोटरस्पोर्ट असेल. त्याच वेळी, त्याचे स्पर्धात्मक प्रकार ब्लॅकस्टॉर्म मेटॅलिक आणि एम मोटरस्पोर्ट पर्यायासह असेल.

(हे ही वाचा : ‘ही’ स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी, २२ वर्षात विकल्या ३ कोटींहून अधिक स्कूटी)

बाईकमध्ये काय आहे खास?

M 1000 RR ही भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेली सर्वात महागडी BMW मोटरसायकल आहे. BMW M 1000 RR ला BMW च्या ShiftCam तंत्रज्ञानासह ९९९ cc, चार-सिलेंडर, वाटर एंड ऑयल-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन १४,५०० RPM वर २१० bhp आणि ११,००० RPM वर ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ते ३.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते आणि त्याचा सर्वाधिक वेग ३१४ किमी प्रतितास आहे.

किंमत

2023 BMW M 1000 RR भारतात ४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी ५५ लाखांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmw motorrad india has launched the 2023 m 1000 rr at a starting price of rs 49 lakh exshowroom in the country pdb
Show comments