BMW R 1300 GSA : बीएमडब्ल्यू इंडिया बाईकचे एक नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. बहुतेक BMW GS बाईक GSA मॉडेलमध्ये येतात. मात्र, आता BMW R 1300 GSA हे या बाइकच्या नवीन मॉडेलपैकी एक आहे. हे मॉडेल नवीन R 1300 प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. मात्र, हे मॉडेल काही खास बदलांसह बाजारात आणले गेले आहे.
BMW R 1300 GSA ची पॉवरट्रेन
BMW R 1300 GSA मध्ये GS मॉडेलप्रमाणे लिक्विड-कूल्ड, हॉरिजन्टली अपोज्ड १३०० सीसी इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन ७,७५० rpm वर १४५ hp इतकी पॉवर देईल आणि ६,५०० rpm वर १४९ Nm टॉर्क जनरेट करेल. या BMW बाईकमध्ये ऑटोमेटेड शिफ्ट असिस्टंटचं फीचरदेखील असेल. त्याच वेळी आवश्यक असल्यास बाईकचालक ऑटोमॅटिक क्लचदेखील लागू करू शकतो.
बाईकमध्ये ३० लिटरची इंधन टाकी मिळेल
हे BMW चे GSA मॉडेल आहे; ज्यामध्ये खूप मोठी म्हणजेच ३० लिटरची इंधन टाकी मिळणार आहे. GS मॉडेलच्या तुलनेत या इंधन टाकीची क्षमता ११ लिटरने वाढविण्यात आली आहे. बाईकचे वजन २६९ किलो आहे; जे R 1300 GS पेक्षा ३२ किलो व R 1250 GSA पेक्षा एक किलो जास्त आहे.
ही बाईक चार प्रकारात आली आहे
BMW R 1300 GSA चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. स्टॅण्डर्ड, ट्रिपल ब्लॅक, जीएस ट्रॉफीव ऑप्शन 719 काराकोरम, असे हे चार प्रकार रायडिंग मोडसह येत आहेत. या बाईकमध्ये इंजिन ब्रेक कंट्रोल, हिल-होल्ड असिस्ट व रडार असिस्टेड यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्येदेखील देण्यात आली आहेत.
हेही वाचा >> पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
या BMW बाइक्सची किंमत किती आहे?
BMW R 1300 GS ची भारतात एक्स-शोरूम किंमत २०.९५ लाख रुपये आहे. ही बाईक भारतीय बाजारात लाँच झाली तेव्हा तिची किंमत R 1250 GSA रुपयांपेक्षा ४० हजार रुपये जास्त होती. सध्या R 1250 GSA ची एक्स-शोरूम किंमत २२.५० लाख रुपये आहे. त्याच वेळी BMW R 1300 GS ची ही प्रीमियम बाइकदेखील या रेंजमध्ये येऊ शकते.