भविष्याचा विचार करताा ऑटो क्षेत्रात गेल्या काही दिवसात बदल पाहायला मिळत आहे. ऑटो आणि इलेक्ट्रिक कंपन्या एकापाठोपाठ एक नव्या इलेक्ट्रिक कार आणि मोटारसायकल लॉन्च करत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार कंपन्यांमध्ये चढोओढ लागली आहे. मर्सडिज बेन्झ, ऑडी आणि जॅग्वॉर इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्यासाठी सज्ज आहेत. तसेच टेस्ला कंपनीही भारतात गाड्या लॉन्च करण्याची तयारीत आहे. यासाठी आता लक्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यूही मागे नाही. पुढच्या सहा महिन्यात एक एक करत तीन इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणणार आहे. पुढच्या महिन्यात बीएमडब्ल्यूची पहिली गाडी लॉन्च होण्याची शक्यता आहे.
बीएमडब्ल्यू iX
इलेक्ट्रिक एसयूव्ही iX ही बीएमडब्ल्यूच्या तीन इलेक्ट्रिक गाड्यांपैकी पहिली गाडी पुढच्या महिन्यात भारतीय बाजारपेठेत उतरणार आहे. ही गाजी अवघ्या ६.१ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग पकडते. तसेच एका चार्जमध्ये ४२५ किमीपर्यंत अंतर कापते. या कारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात येणारे बहुतांश भाग हे नैसर्गिक साहित्य किंवा पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनवलेले आहेत. ही कार डिसेंबरमध्येच लॉन्च होण्याची शक्यता आहे.
बीएमडब्ल्यू Mini Electric
बीएमडब्ल्यूची दुसरी इलेक्ट्रिक गाडी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार आहे. ही मिनी इलेक्ट्रिक कार आहे. या कारची क्रेझ इतकी आहे की कंपनीने नुकतेच तिची बुकिंग सुरू केली असून तिचे सर्व ३० युनिट्स बुक झाले आहेत. मिनी इलेक्ट्रिक कार एका चार्जवर २७० किमीपर्यंत अंतर कापते. मार्च २०२२ आधी ही गाडी भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.
बीएमडब्ल्यू i4
बीएमडब्ल्यूच्या इलेक्ट्रिक वाहन श्रेणीतील सेडान i4 ही गाडी पहिल्या सहामाहीत भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्याची शक्यता आहे. लक्झरी फीचर्सने युक्त ही गाडी एका चार्जवर ४८० किमीपेक्षा जास्त अंतर कापू शकते. या कारबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. कंपनीची ही तीन इलेक्ट्रिक वाहने कंप्लीट बिल्ट युनिट (CBU) मार्गाने भारतीय बाजारपेठेत दाखल होतील.