बीएमडब्ल्यूने गुरुवारी भारतात X3 एसयूव्ही डिझेल प्रकारात लाँच केली आहे. नवीन कारची किंमत ६५.५० लाख (एक्स-शोरूम) आहे. ही गाडी चेन्नई येथील कंपनीच्या प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित केली जाते. आजपासून ही गाडी अधिकृत बीएमडब्ल्यू डीलरशिपवर उपलब्ध असेल. नवीन बीएमडब्ल्यू X3 डिझेल इंजिन हे दोन-लिटर चार-सिलेंडर युनिट आहे. जे १४० किलोवॅट/१९० एचपीचं आउटपुट आणि १७५० – २५०० आरएमपीवर ४०० एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. बीएमडब्ल्यू X3 डिझेल फक्त ७.९ सेकंदात २१३ किमी/ताशी १०० किमी प्रतितास वेग वाढवते. लूकच्या बाबतीत, X3 xDrive20d लक्झरी व्हेरियंट असलेल्या पेट्रोल वर्जनसारखीच आहे.
२०२२ मॉडेलला नवीन वैशिष्ट्यांसह अपडेटेड केबिन देखील मिळते. याशिवाय, यात मल्टी-फंक्शन स्पोर्ट स्टीयरिंग व्हील, मेमरी फंक्शनसह इलेक्ट्रिक सीट समायोजन, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, अॅम्बियंट लाइटिंग आणि थ्री-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील दिलं आहे. ४०/२०/४० स्प्लिट रीअर सीट बॅकरेस्ट खाली फोल्ड करून ५५० लिटरची बूट स्पेस १६०० लिटरपर्यंत वाढवता येते. बीएमडब्ल्यू लाइव्हा कॉकपिट प्रोफेशनल आणि 3D नेव्हिगेशनसह १२.३ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मानक आहे. १२.३ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम बीएमडब्ल्यू जेश्चर कंट्रोल्सद्वारे देखील नियंत्रित केली जाऊ शकते. याशिवाय तुम्हाला वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, आणि हरमन कार्डन साउंड सिस्टम देखील मिळत आहे. सुरक्षिततेसाठी, 2022 BMW X3 ला ६ एअरबॅग्ज, ३६० व्ह्यू कॅमेरासह पार्किंग असिस्टंट प्लस, अटेन्शन असिस्टन्स, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल (DSC), कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल (CBC), ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, साइड-इम्पॅक्ट प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक कार इमोबिलायझर आणि क्रॅश सेन्सर, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग आणि लोड फ्लोअरच्या खाली इंटीग्रेटेड आपत्कालीन स्पेअर व्हीलदेखील दिला आहे.
भारतात भाडेतत्त्वावर घेऊ शकता महिंद्राच्या गाड्या, जाणून घ्या नेमकी काय आहे योजना
लक्झरी एडिशन म्हणून सादर केलेले, नवीन बीएमडब्ल्यू X3 xDrive20d मिनरल व्हाइट, फायटोनिक ब्लू, ब्रुकलिन ग्रे, सोफिस्टो ग्रे, ब्लॅक सॅफायर आणि कार्बन ब्लॅक यासह विविध रंगांच्या पर्यायांमध्ये येते. नवीन बीएमडब्ल्यू X3 एसयूव्हीसह, कंपनी ‘BMW सर्व्हिस इनक्लुसिव्ह’ आणि ‘BMW सर्व्हिस इनक्लुसिव्ह प्लस’ सारख्या पर्यायी कंपनी सेवा देखील देत आहे. या सेवा पॅकेजमध्ये ३ वर्षे/४०,००० किमी ते १०वर्षे /२,००,००० किमीपर्यंतच्या योजनांसह कंडिशन बेस्ड सर्व्हिस (CBS) आणि देखभालीचे काम समाविष्ट आहे. या सेवांची किंमत प्रति किमी १.५३ रुपयांपासून सुरू होते.