BMW X7 Signature launched: BMW या कंपनीचे नाव ऐकले नसेल अशी एकही व्यक्ती नाही. BMW ही एक लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे, जी आपल्या कारची केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विक्री करते. याच बीएमडब्ल्यू कंपनीनं नवीन BMW X7 सिग्नेचर एडिशन भारतात लाँच केली आहे, जी अधिक ग्लॅमर आहे. या कारची आता लक्झरी क्रॉसओवर SUV, ऑडी Q7 शी स्पर्धा असणार आहे.
सणासुदीच्या हंगामासाठी ऑटोमेकर्स त्यांच्या कारच्या विशेष आवृत्त्या लाँच करत आहेत. लक्झरी कार निर्माता BMW Motorrad ने BMW X7 चे सिग्नेचर एडिशन भारतात लॉंच केले आहे. कंपनीने याला xDrive 40 iM स्पोर्ट या एकाच प्रकारात सादर केले आहे. BMW च्या लक्झरी क्रॉसओवर SUV ची किंमत १.३३ कोटी रुपये (एक्स-शोरूम पॅन-इंडिया) आहे. हे मॉडेल कंपनीच्या चेन्नई प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर तयार केले जाईल आणि बीएमडब्ल्यू ऑनलाइन शॉपद्वारे बुक केली जाऊ शकते.
BMW X7 सिग्नेचर एडिशन : नवीन काय आहे?
X7 चे डिझाईन अनेकांसाठी आतापर्यंतची खास डिझाईन असू शकते. तसेच कारच्या ग्रिलला आता स्वारोवस्की ग्लास कट क्रिस्टल हेडलॅम्पसह असणार आहे, जी एक अद्वितीय रोषणाई निर्माण करते. कारच्या समोरच्या ग्रिलला, खिडकीच्या चौकटीला सिल्व्हर फिनिशिंग मिळणार आहे. हे दोन रंगांमध्ये म्हणजेच टांझानाइट ब्लू आणि द्राविट ग्रे उपलब्ध आहेत.
BMW X7 सिग्नेचर एडिशन : इंटिरिअर
इंटिरिअरमध्ये ड्युअल-टोन कलर कॉम्बिनेशन आहे, तर डॅशबोर्डला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये एसी व्हेंट्सच्या समोर क्रोम फिनिश मेटल स्ट्रिपसह अनेक पॅनेल्स मिळतात. X7 सिग्नेचर आवृत्तीमध्ये पॅनोरामिक सनरूफ, SUV मध्ये क्रिस्टल डोअर पिन, अल्कँट्रामधील कुशन आणि मेरिनो लेदर सीट्स आहेत. यात प्रीमियम १६ स्पीकर्स हार्मन कार्डन म्युझिक सिस्टम आहे.
BMW X7 सिग्नेचर : इंजिन
BMWX7 सिग्नेचर हे ३ लिटरचे ६ सिलेंडर इन-लाइन पेट्रोल इंजिनचे आहेत. BMW नुसार, SUV 0 -100 kmph वरून m ५.८ सेकंदात वेग वाढवते. याव्यतिरिक्त, इंजिनमध्ये १२ एचपी पॉवर आउटपूट आणि २०० Nm टॉर्क आउटपूटसह ४८V इलेक्ट्रिकल मोटर आहे.
हेही वाचा >> Kia Carnival: किया कार्निवलचे बुकिंग सुरु; मिळणार दमदार फीचर्स, जाणून घ्या काय असेल किंमत
BMW X7 सिग्नेचर : वैशिष्ट्ये
BMW X7 सिग्नेचर कार ऑल-व्हील ड्राइव्हट्रेनवर आधारित आहे. यात ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि अडॅप्टिव्ह एअर आहे, जे ड्रायव्हिंगच्या परिस्थितीनुसार एसयूव्हीची उंची ऑटोमॅटिक ॲडजस्ट करते.