BMW ने भारतात आपली फ्लॅगशिप XM SUV लॉन्च केली आहे. BMW XM सह नवीन BMW M340i xDrive, BMW S1000 RR लाँच करण्यात आली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जॉयलँड या कार्यक्रमात या तीन वेगवान, मॉडर्न डिझाईन लाँच करण्यात आल्या. नवीन BMW XM SUV 0 ते १०० ताशी किलोमीटर पर्यंत ४.३ सेकंदात वेग घेऊ शकते तसेच पूर्ण इलेक्ट्रिक मोडमध्ये ८० किमी धावू शकते.
BMW XM SUV इंजिन क्षमता
नवीन BMW XM SUV हे प्लग-इन हायब्रीड पॉवरट्रेन इंजिन आहे. या मॉडेलचे खास फीचर म्हणजे ४. ४ -लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन वैशिष्ट्यीकृत करणारे पहिले मॉडेल आहे. यात ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या मदतीने ६४४ bhp आणि ८०० Nm टॉर्क तयार होऊ शकतो.
BMW XM SUV डिजाईन
डिझाइनच्या बाबतीत, नवीन BMW XM आकाराने BMW X7 प्रमाणेच आहे. XM ला सोन्यामध्ये हायलाइट केलेली मोठी किडनी ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन, 21-इंच चाके आणि मागील बाजूस उभ्या स्टॅक केलेले एक्झॉस्ट मिळतात. ग्राहक 22 किंवा 23-इंच चाकांची डिझाईन सुद्धा निवडू शकतात.
नवीन BMW XM मध्ये मागील बाजूस ‘M लाउंज’ आहे, जे आरामासाठी डिझाइन केलेले आहे. तर SUV मध्ये कार निर्मात्याने ऑफर केलेल्या सर्व कनेक्टेड कार टेकसह 14.9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, लहान 12.3-इंचाचा डिस्प्ले सुद्धा यात देण्यात आला आहे.
BMW XM SUV सुरक्षा उपाययोजना
BMW XM वरील सुरक्षा वैशिष्ट्य सुद्धा खास आहेत. या पॉवरफुल बिस्टमध्ये एकाधिक एअरबॅग्ज, EBD सह ABS, पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा, ADAS, ISOFIX, चाइल्ड सीट अँकर आणि बरेच काही समाविष्ट आहे. या बीएमडब्ल्यूला चार-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टीम आणि हरमन कार्डन सराउंड साउंड सिस्टीम देखील देण्यात आली आहे.
BMW XM SUV किंमत
BMW XM SUV एक्स शोरूम दरात तब्बल २ कोटी ६० लाखात लाँच करण्यात आली आहे.
दरम्यान, XM ची अधिक शक्तिशाली आवृत्ती, ‘लेबल रेड’ ही येत्या सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी लॉन्च केली जाणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली आहे. BMW XM लेबल रेड 738bhp आणि 1,000Nm टॉर्कसह आतापर्यंतचे सर्वात वेगवान मॉडेल ठरणार आहे.