जर्मन कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने भारतात X6 50 Jahre M Edition’ सादर केले आहे. बीएमडब्‍ल्‍यूच्या ‘एम’ श्रेणीतील वाहने अधिक चालक-केंद्रित आणि बीएमडब्‍ल्‍यूच्या एम विभागाने उत्पादित केलेली उच्च कार्यक्षमता मॉडेल आहेत. बीएमडब्‍ल्‍यूच्या एम विभागाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त ’50 Zahr M Edition’ तयार करण्यात आली आहे. नवीन स्पेशल एडिशनला कॉस्मेटिक तसेच मेकॅनिकल अपग्रेड्स मिळतात.

डिझाईन

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : कोणती दुचाकी आहे लयभारी? फिचर्सपासून किंमतीपर्यंत; जाणून घ्या, एका क्लिकवर
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!
Kia Syros Bookings Start Tonight
Kia Syros : थ्री इंजिन पर्याय, ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स अन् बरेच काही; टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही

50 Jahre M एडिशनमधील इतर कारप्रमाणे, X6 Jahre M Edition ला BMW Motorsport लोगो आणि M Edition बॅज मिळतो. डिझाईनच्या बाबतीत, X6 50 Jahre M Edition ला अॅल्युमिनाइज्ड किडनी ग्रिल, २०-इंच अलॉय व्हील, रेड ब्रेक कॅलिपर आणि मस्क्यूलर फ्रंट बंपर मिळतात.

या कारमध्ये लेझर एलईडी हेडलाइट्स लावण्यात आले आहेत, ज्याची रेंज ५०० मीटरपर्यंत आहे. दुसरीकडे, कारच्या मागील बाजूस एलईडी टेल लाइट्स, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, हरमन कार्डन सराउंड साऊंड सिस्टीम, सॉफ्ट सीट्स, वायरलेस चार्जिंग, पॉवर्ड टेलगेट, डोअर प्रोजेक्टर आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

आणखी वाचा : टाटा टियागो दिसणार आता नव्या अवतारात; जाणून घ्या फीचर्स

इंजिन

तांत्रिक सुधारणांच्या बाबतीत, X6 50 Jahre M Edition ला एम ब्रेक कॅलिपर, एम एक्झॉस्ट सिस्टम आणि अडॅप्टिव्ह सस्पेंशन मिळते. हे ३-लीटर इन-लाइन ६-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे ३४० bhp पॉवर आणि ४५० एनएम टॉर्क जनरेट करते. ते फक्त ५.५ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड २५० किमी/तास आहे.

BMW लिमिटेड एडिशन मॉडेलवर दोन पर्यायी बाह्य पॅकेजेस देखील ऑफर करत आहे. पहिले रेसर पॅकेज आहे ज्यामध्ये ब्लॅक साइड डिकल्स आणि रियर स्पॉयलर समाविष्ट आहे, तर दुसरे मोटरस्पोर्ट्स पॅकेज आहे ज्यामध्ये कार्बन फायबर विंग मिरर आणि अल्कंटारा-फिनिश की फोब समाविष्ट आहे.

किंमत

भारतीय बाजारात BMW X6 ’50 Jahre M Edition’ ची एक्स-शोरूम किंमत १.११ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.  कंपनीने लॉन्चसोबतच बुकिंगही सुरू केले आहे. BMW X6 ’50 Jahre M Edition’ साठी बुकिंग फक्त ऑनलाइन वेबसाइटवरूनच करता येईल. BMW कारची ही विशेष आवृत्ती मर्यादित संख्येत विकणार आहे.

Story img Loader