Hrithik Roshan Car Collection: बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता हृतिक रोशन आज १० जानेवारी रोजी आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिकने अनेक चित्रपटांमधील आपल्या शानदार व्यक्तिरेखेने आणि अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या हृतिकने २०२२ मधील ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने दर्शकांची मने जिंकली. आपल्या चित्रपटांनी लोकांना पडद्यावर वेड लावणाऱ्या हृतिक रोशनला कारची खूप आवड आहे. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक कार आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया त्याच्या कार कलेक्शनबद्दल.

हृतिक रोशनकडे आहेत ‘या’ महागड्या कार

Rolls-Royce Ghost Series II

Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

हृतिक रोशनकडे जगातील सर्वात आलिशान कारपैकी Rolls-Royce Ghost Series II ही कार आहे. हृतिक रोशनने त्याच्या ४२ व्या वाढदिवसाला स्वतःला ही कार गिफ्ट केली आहे. या कारची भारतातील किंमत रु.७ कोटी पासून सुरू होते. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या कारपैकी ही एक आहे.

Aston Martin Rapide S

हृतिक रोशनने अलीकडेच विकत घेतलेल्या कूप रॅपिडवर ही कार आधारित आहे. ही चार-दरवाजा सुपर स्पोर्ट्स सेडान ६.०-लिटर V१२ इंजिनद्वारे समर्थित आहे जी ६६५० rpm वर ५५२ hp निर्माण करण्यासाठी ट्यून आहे. ही कार ४.४ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग वाढवू शकते.

(हे ही वाचा : कन्नड़ फिल्म सुपरस्टार यशचं कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क, अभिनेत्याकडे आहेत ‘इतक्या’ महागड्या कार )

Ford Mustang

हृतिकच्या गॅरेजमधील सर्वात मनोरंजक आणि प्रसिद्ध कार म्हणजे १९६६ ची फोर्ड मस्टँग. Cayenne SUV प्रमाणे, Mustang ने देखील ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवून आणली आणि “मसल कार” हा शब्द फोर्डशी जोडला. 2000 मध्ये हृतिकने ही कार परत खरेदी केली होती.

Porsche Cayenne Turbo

Porsche Cayenne Turbo ही कार २००२ मध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार २००६ मध्ये हृतिकच्या गॅरेजमध्ये सामील झाली.

(हे ही वाचा : बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीकडे आहे लक्झरी कारचा मोठा संग्रह! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क )

MINI Cooper Convertible Car

Mini Cooper Convertible ही हृतिकची रोजची कार आहे आणि तो अनेकदा आपल्या मुलांसोबत ही कार चालवताना दिसतो. मिनी कूपर ही मुंबईच्या रस्त्यांसाठी आदर्श कार आहे. हे २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे १९२ bhp आणि २८० Nm पीक टॉर्कसाठी चांगले आहे.

Ferrari 360 Modena

हृतिक रोशन हा कार प्रेमी आहे, त्यामुळे अभिनेत्याकडे फेरारी म्हणजेच 360 मोडेना असणे स्वाभाविक आहे. 360 मोडेना हे मध्य-इंजिनयुक्त, दोन-सीटर कूप आहे, जे ३.६-लिटर V८ द्वारे समर्थित आहे जे ८,५०० rpm वर ४००hp आणि पीक टॉर्क ३७२ Nm साठी चांगले आहे.

Story img Loader