Salman Khan Birthday Special: बॉलिवूडचा सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज २७ डिसेंबर त्याचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान आणि सुलतान या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. गेली अनेक दशके तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. इतर बॉलीवूड कलाकारांप्रमाणे त्याच्याकडेही आलिशान गाड्यांचा मोठा संग्रह आहे. सलमानकडे ऑडी, मर्सिडीज ते लेक्सस सारख्या कंपन्यांच्या गाड्या आहेत. चला तर आज सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कार कलेक्शननविषयी जाणून घेऊया.
सलमान खानकडे ‘या’ आहेत महागड्या कार
Audi A8L
सलमान खानकडे Audi A8L ही एक सेडान कार आहे. या कारची किंमत १.५० कोटी रुपये आहे. ज्यामध्ये ३.०-लीटर पेट्रोल इंजिन आहे. त्याचा टॉप स्पीड २५० किमी प्रतितास आहे आणि ही सेडान कार फक्त ६.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
Audi RS7
सलमान खानची दुसरी ऑडी RS7 आहे, ज्याची किंमत २.२ कोटी रुपये आहे. ही एक शक्तिशाली कार असून ती ४.०-लीटर ट्विन टर्बो V8 पेट्रोल इंजिनसह येते. हे ५९१ Bhp पॉवर आणि ८०० Nm टॉर्क आउटपुट तयार करते. कारचा टॉप स्पीड २५०Kmph आहे आणि ती फक्त ३.६ सेकंदात ० ते १००Kmph पर्यंत वेग पकडू शकते.
(हे ही वाचा : Ankita Lokhande Cars Collection: अंकिता लोखंडेलाही आहे महागड्या गाड्यांचा शौक; किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का)
Mercedes Benz AMG GLE43 आणि GL 350 CDI
सलमानकडे दोन मर्सिडीज कार आहेत. ज्यामध्ये AMG GLE43 आणि GL 350 CDI समावेश आहे. AMG GLE43 कारची किंमत १.२० कोटी रुपये आहे आणि ती फक्त ५.७ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग घेऊ शकते. तर GL 350 CDI कारची किंमत ८० लाख रुपये आहे. या कारचा टॉप स्पीड २५०Kmph आहे आणि ती फक्त ४.९ सेकंदात ० ते १००Kmph पर्यंत वेग पकडू शकते.
Mercedes S class
सलमान खानकडे आणखी एक मर्सिडीज कार आहे. या कारचे नाव Mercedes S class असे नाव आहे. त्याची किंमत १.६० कोटी रुपये आहे. यात ३.०-लिटर V6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे ३६२ bhp आणि ५०० Nm टॉर्क आउटपुट देते.
Porsche Cayenne Turbo
सलमानच्या कलेक्शनमध्ये Porsche Cayenne Turbo ही एक कॉम्पॅक्ट SUV आहे. या SUV ची किंमत १.५० कोटी रुपये आहे. हे ५.० लीटर V8 पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही केवळ ४.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड २८६Kmph आहे.
(हे ही वाचा : Govinda Cars Collection: हिरो नंबर वन आहे ‘या’ महागड्या कारवर फिदा; किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का )
Land Rover Range Rover Vogue
Land Rover Range Rover Vogue ही बॉलिवूड सेलिब्रिटींकडे असणारी खूप प्रसिद्ध कार आहे. या कारची किंमत २.४ कोटी रुपये आहे. हे ३.०-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे ३९४ Bhp आणि ६५० Nm जनरेट करते. टॉप स्पीड २०९ किमी प्रतितास आहे आणि ते फक्त ७.४ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
Lexus LX
सलमान खानकडे जुन्या पिढीतील Lexus LX आहे. त्याच्या संग्रहातील ही सर्वात जुनी कार आहे. यात ६ सिलेंडर डिझेल इंजिन आहे. त्यावेळी Lexus LX ची किंमत ३५ लाख रुपये होती.