Auto Expo 2023: मारुती नंतर, देशातील दुसरी आघाडीची कार उत्पादक कंपनी Hyundai ने आपली सब-कॉम्पॅक्ट सेडान कार ‘Hyundai Aura’ अनेक अपडेट्ससह अनवील केले. ज्यामध्ये फीचर्ससह त्याच्या इंजिन आणि डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यासोबतच कंपनीने अधिकृतरीत्या या कारचे बुकिंगही सुरू केले आहे.
Hyundai Aura मध्ये ‘असे’ करण्यात आले बदल
Hyundai च्या या अपडेटेड सेडानमध्ये ऑटो हेडलॅम्प, नवीन १५-इंच अलॉय व्हील, नवीन फ्रंट बंपर, ब्लॅक रेडिएटर ग्रिल, नवीन DRLs आहेत. त्यामुळे त्याचा लूक आधीच आकर्षक दिसत आहे. कंपनी सहा रंगांच्या पर्यायांसह ही कार सादर करणार आहे. ज्यामध्ये स्टाररी नाईट हा नवीन रंग म्हणून समाविष्ट केला जाईल.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स)
Hyundai Aura वैशिष्ट्ये
आतील वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, Hyundai ने त्यात अनेक वैशिष्ट्यांमध्ये बदल केले आहेत. सेडानमध्ये नवीन ३.५-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, USB-C प्रकारचा चार्जिंग पोर्ट मिळेल. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यात चार एअरबॅग देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन एअरबॅग स्वतंत्रपणे बसवण्याचाही पर्याय असेल. यासोबतच या कारमध्ये बर्गलर अलार्म, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल (एचएसी) आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
(हे ही वाचा : Tata Motors च्या ‘या’ छोट्या इलेक्ट्रिक ट्रकची डिलिव्हरी सुरु; १५४ किमीची मिळतेय रेंज, किंमत… )
इंजिन आणि पॉवर
Hyundai Aura 2023 sedan कारला १.२-L Kappa पेट्रोल इंजिन मिळेल. जे ५-स्पीड मॅन्युअल (MT) किंवा स्वयंचलित (AMT) ट्रान्समिशनशी जोडले जाईल. हे इंजिन ८३ PS ची कमाल पॉवर आणि ११३.८ Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. कारला CNG किटचा पर्याय देखील मिळेल, जो जास्तीत जास्त ६९ PS पॉवर आणि ९५.२ NM पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. ह्युंदाईची ही कार मारुतीच्या सेडान कार डिझायरशी स्पर्धा करेल.
(हे ही वाचा : Auto Expo 2023: लवकरच बदलणार तुमची कार चालवण्याची पद्धत ‘ही’ कंपनी देशात सादर तंत्रज्ञानाने सुसज्ज कार )
Hyundai Aura किंमत
ग्रेटर नोएडामध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार लाँच केली जाणार आहे. २०१९ मध्ये ही कार लाँच करण्यात आली असून २०२३ ची ही पहिली अपडेट आहे. Hyundai Aura फेसलिफ्ट तुम्हाला ११ हजार रुपयांत बुक करता येणार आहे. किंमतीची घोषणा ही या आठवड्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.