Electric scooter Okaya Faast: ओकाया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने ४.४. kW ची लिथियम फॉस्फेट बॅटरी दिली आहे, जी १५० ते २०० किमीची रेंज देते. तुम्हालाही बुक करायचं असेल तर कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही २ हजार रुपये टोकन रक्कम भरून बुक करू शकता. ओकाया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ८९,९९९ रुपये (राज्य अनुदान वगळता) इतकी आहे. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सर्व फिचर्सबद्दल….
Okaya Faast E- scooter
त्याच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन ओकाया फास्ट तुम्हाला ६० ते ७० किलोमीटर प्रति तास इतका टॉप स्पीड देते. तसंच तिच्या रेंजबद्दल सांगायचं तर, ओकायाची ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये जास्तीत जास्त २०० किमीची रेंज देऊ शकते. पण या इलेक्ट्रिक स्कुटरचा सामान्य वेग १५० किमी पर्यंत आहे. यात ४.४ kW लिथियम फॉस्फेट बॅटरी मिळते. याशिवाय, अतिरिक्त सुरक्षिततेसाठी यात एलईडी डीआरएलसह एक एलईडी हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देखील मिळत आहे.
आणखी वाचा : Wow! फक्त ३० हजारात खरेदी करा Honda Activa, एक वर्षाची वॉरंटी, 60 kmpl ची मायलेज
ओकोया फास्ट इलेक्ट्रिक स्कूटर ही अशा स्कूटरपैकी एक आहे जी बजेटमध्ये अधिक रेंजचा देते. पण, तिच्या रेंजमधल्या स्कुटरबद्दल बोलायचं झालं तर, ओला एस वन आणि सिंपल वन सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर १५० ते २०० किमी पेक्षा जास्त रेंजचा दावा करतात.
ओला एस वन प्रो
Ola ने ऑफर केलेल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro आहेत. Ola S One Pro बद्दल बोलायचं झालं तर एक्स-शोरूमनुसार त्याची किंमत १.१० लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३.९७ KWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, ओला कंपनी १८० किमी सिंगल चार्जचा दावा करते. त्याच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचं झालं तर, ते जास्तीत जास्त ११५ किमी प्रतितास स्पीड देते.
आणखी वाचा : शानदार ऑफर! केवळ २१ हजारात घरी न्या Bajaj Discover 150 बाईक
सिंपल वन
सिंपल एनर्जीने ऑफर केलेल्या कमाल रेंजमधील इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल वनची एक्स-शोरूमनुसार किंमत १.०९ लाख रुपये इतकी आहे. तिच्या रेंजबद्दल बोलायचं झालं तर ते २३६ किमीची रेंज देण्याचा दावा करते. त्याचवेळी, ४.८ kwh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी १ तास पाच मिनिटांत चार्ज होऊ शकते. तसंच याचा टॉप स्पीड ११५ किमी/तास आहे.