Bounce Infinity E1 Electric Scooter: देशात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होत आहे.  आता वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आणखी एक स्फोट झाला आहे. बाऊन्स कंपनीने आपला नवीन इन्फिनिटी E1 बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने ही स्कूटर बॅटरीसह आणि बॅटरीशिवाय विकत घेण्याचा पर्याय दिलाय. बॅटरी ० ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तास लागतात. यात ईको आणि पॉवर असे २ ड्रायव्हिंग मोड देखील मिळतात.

या स्कूटरच्या लॉन्चिंगमुळे आता बजाज, ओला, एथर आणि टीव्हीएससारख्या कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचे कारण म्हणजे Bounce Infinity E1 ची खास वैशिष्ट्ये आणि त्याची किंमत श्रेणी. कंपनीने ही स्कूटर ५४,४४३ ते ८८,४७८ रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे. यासोबतच स्कूटरला स्वॅप करण्यायोग्य बॅटरीचा पर्याय देण्यात आला आहे, ज्यामुळे त्याची रेंज अमर्यादित होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह सादर केली आहे. त्याचे चार्जिंग सामान्य चार्जरच्या मदतीने घरी करता येते. Bounce Infinity E1 मध्ये २kwh ८V बॅटरी पॅक देण्यात आलाय. यात ड्रॅग, इको आणि पॉवर असे तीन ड्रायव्हिंग मोड्सही देण्यात आले. पॉवर मोडमध्ये या स्कूटरचा कमाल वेग ६५ किमी असेल. इको मोडमध्ये ही स्कूटर ८५ किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. ही स्कूटर डार्क ग्रे, ऑफ-व्हाईट, रेड, व्हाईट आणि ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

(हे ही वाचा : ७.७९ लाखाच्या टाटाच्या ‘या’ SUV समोर Maruti, Hyundai च्या सगळ्या गाड्या फेल, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा )

कंपनीने या Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LED प्रोजेक्टर हेडलँप, LED हेडलाइट, १२-लिटर बूट स्पेस आणि हायड्रॉलिक सस्पेंशन आणि डिजिटल स्पीडोमीटर दिले आहेत. यात जिओफेन्सिंग, ड्रॅग मोड, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल, अँटीथेफ्ट, टो अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरसोबत कंपनीने इन्फिनिटी स्मार्ट अॅप्लिकेशन देखील लाँच केले आहे जे ब्लूटूथद्वारे स्कूटरशी कनेक्ट केले जाऊ शकते. उत्तम ब्रेकिंगसाठी, पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. कंपनीने यामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीम (EBS) वापरली आहे जी ब्रेकिंगची कार्यक्षमता सुधारते आणि ब्रेक लावताना बॅटरी देखील चार्ज करते.

ही स्कूटर मस्त रेट्रो डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे. यात LEDs तसेच DRL सह गोल हेडलॅम्प्स मिळतात. तुम्हाला स्कूटरमध्ये दोन प्रोजेक्टर युनिट्स मिळतील जे हाय आणि लो बीमसाठी आहेत. तसेच, हेडलाइट क्लस्टर हँडलबारच्या वर दिलेला आहे. यामुळे स्कूटरचा लूक चांगलाच वाढला आहे. टेल लाईट आणि इंडिकेटरलाही एलईडी देण्यात आले आहेत. त्याचवेळी, स्कूटरमध्ये एलसीडी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, ड्रायव्हर अॅनालॉग यांसारख्या अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

Story img Loader