प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. नुकतेच भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड ‘मोटोवोल्ट’ने अर्बन इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. या बाईकची किंमत ५०,००० रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या बाईकचे मुख्य आकर्षण म्हणजे ही बाईक फक्त ९९९ रुपयांमध्ये बुक करता येते. ही बाईक पूर्ण चार्जमध्ये १२० किमीची रेंज देते. युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी ही बाईक तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे, या बाईकला चालवण्यासाठी कोणत्याही परवान्याची किंवा नोंदणीची गरज नाही.

१२० किमीची जबरदस्त रेंज
कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी पूर्ण चार्ज असताना ही बाईक १२० किमी पर्यंतची रेंज देईल. तसेच, एका चार्जवर, ते २५ किमी प्रतितास वेगाने चालवता येते. ब्रेकिंगसाठी, तुम्हाला या ई-बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ड्युअल शॉक मिळतात आणि दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक्स आहेत.

आणखी वाचा : बाजारपेठेत फक्त ३५ हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर सादर; ओला आणि बजाजला देणार टक्कर

मोटोव्होल्ट ई-बाईकचे वैशिष्ट्ये
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर मोटोवोल्ट अर्बन इलेक्ट्रिक बाईकमध्ये फीचर्सची एक लांबलचक यादी दिसत आहे. यामध्ये पेडल असिस्ट सेन्सर, इग्निशन की स्विच, २०-इंच चाके, एकाधिक राइडिंग मोडसह हँडल लॉक समाविष्ट आहे. यासोबतच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोलचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या विभागामध्ये, ते अर्बन बाउन्स इन्फिनिटी E1 आणि Hero Electric Optima CX मॉडेलला टक्कर देते.

Story img Loader