तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. मारुती सुझुकी ईको ही देशातली सर्वात स्वस्त ७ सीटर कार आहे. मारुती सुझुकी कंपनीची मारुती ईको सीएनजी व्हेरियंट तुम्हाला ६०, हजार रुपयात घरी आणता येणार आहे. जाणून घेऊया या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल सर्व माहिती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुती ईको सीएनजी

या कारचं सीएनजी व्हेरिएंट ५.९४ लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही एक्स शोरूममधील किंमत आहे. या कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. ही कार सीएनजी किटसह ६३ पीएस पॉवर आणि ८५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. ही कार सीएनजीवर २० किमीपेक्षा जास्त मायलेज देते. ही देशातली बेस्ट सेलिंग ७ सीटर कार आहे. मारुती सुझुकीने गेल्या महिन्यात या कारचे १२,६९७ युनिट्स विकले आहेत.

आणखी वाचा : Tata Blackbird SUV ‘या’ दिवशी लाँच होणार; क्रेटा आणि वेन्यूला देणार टक्कर, जाणून घ्या फीचर्स…

मारुती ईको सीएनजी फायनान्स प्लॅन

तुम्ही मारुती सुझुकी ईको खरेदी करण्यासाठी कर्जासाठी अर्ज केल्यास, ऑनलाइन उपलब्ध फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, बँक ते खरेदी करण्यासाठी वार्षिक ८.९ टक्के व्याजदरासह ५,९९,४२६ रुपये कर्ज देईल.

कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला या एमपीव्हीचे डाउन पेमेंट म्हणून ६० हजार रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला पुढील पाच वर्षांसाठी दरमहा १२,६७७ रुपये मासिक ईएमआय जमा करावे लागतील.