तुम्ही जर या दिवाळीत दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण देशातील बड्या ऑटो मोबाईल कंपन्याही नवनवीन ऑफर्स देत आहेत. जर तुम्हाला या ऑफर्सचा फायदा घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. देशातील सर्वात मोठी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनीने आपल्या दुचाकींवर फेस्टिव्हल ऑफर्स आणल्या आहेत.

आता होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनीची होंडा शाइन मोटरसायकल तुम्हाला तीन ऑफर्ससह खरेदी करता येणार आहे. या ऑफर्समुळे तुम्हाला कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय शाइन खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर कंपनी यावर नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देत ​​आहे. तसेच दुचाकी खरेदी केल्यावर तुम्हाला ५ हजार रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे. कंपनीची ही ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत असेल.

आणखी वाचा : दिवाळी धमाका! ऑक्टोबर महिन्यात Virtus आणि Taigun या कार्सवर बंपर डिस्काऊंट; मिळेल एवढी सूट…

शाइनच्या स्पेशल एडिशनची वैशिष्ट्ये

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया कंपनी ने ऑगस्टमध्ये त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या दुचाकी शाइनचं स्पेशल एडिशनही नुकतेच सादर केले आहे. नवीन होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशनला कॉस्मेटिक अपडेट्स आणि नवीन रंगसंगती आहेत. ही दुचाकी मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि मॅट संगरिया रेड मेटॅलिक अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

सेलिब्रेशन एडिशनमध्ये लोगो इंधन टाकीवर आहे. होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशन १२३.९४ सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍ट इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन ७,५०० आरपाएमवर १०.५ bhp पॉवर आणि ६,००० आरपाएमवर वर ११ एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. दुचाकीला सीबीएससोबत मागील बाजूस ड्रम ब्रेक आणि पुढच्या बाजूला ड्रम/डिस्कचा पर्याय मिळतो. या सेलिब्रेशन एडिशन दुचाकीला नवीन लूक देण्यासाठी सॅडल ब्राऊन सीट, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक मफलर कव्हर, गोल्डन कलरचा सेलिब्रेशन लोगो वापरण्यात आला आहे.

Story img Loader