BSA Gold star 650 India Launch: गुरुवारी देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. ७७ वर्षांपूर्वी या दिवशी देशाला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. वाहन उद्योगासाठीही हा दिवस मोठा आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतात अनेक नवीन बाईक आणि कार लाँच करण्यात आल्या आहेत. या नवीन वाहनांच्या लाँचच्या लिस्टमध्ये ब्रिटीश ऑटोमेकर BSA मोटरसायकलच्या बाईकचे नावदेखील समाविष्ट आहे. लोकप्रिय ब्रिटीश मोटरसायकल ब्रँड BSA (Birmingham Small Arms) ने व्यवसायाच्या विस्तारासाठी भारतात एन्ट्री केली आहे. BSA Gold Star 650 असे या बाईकचे नाव असून, भारतात कंपनीची थेट स्पर्धा Royal Enfield शी असेल.
रॉयल एनफिल्डला देणार टक्कर
ब्रिटीश बाईक निर्माता BSA मोटरसायकलने भारतीय बाजारात गोल्ड स्टार 650 लाँच केली आहे. या बाईकचे बुकिंगही गुरुवार, १५ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. BSA गोल्ड स्टार 650 युनायटेड किंगडम आणि युरोपमध्ये २०२१ पासून विक्रीसाठी आहे. त्याचवेळी ब्रिटीश वाहन निर्मात्यांनी आता ही बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. BSA Gold Star 650 भारतीय बाजारपेठेत थेट रॉयल एनफिल्डच्या Interceptor 650 किंवा Super Meteor शी स्पर्धा करेल.
जबरदस्त फिचर्स
कंपनीने बाईकमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. या बाईकमध्ये बसवलेले इंजिन ६,५०० rpm वर 45 bhp ची पॉवर देते आणि ४,००० rpm वर 55 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये मोटरसोबत 5-स्पीड गिअर बॉक्स बसवण्यात आला आहे. या BSA बाईकमध्ये ड्युअल चॅनल ABS चे फीचर्स आहे. या बाईकच्या पुढील चाकामध्ये ३२० मिमी डिस्क ब्रेक लावण्यात आले आहेत. मागील चाकामध्ये २५५ मिमी डिस्क ब्रेक बसवले आहेत.
हेही वाचा >> Ola Electric Bike: अखेर प्रतीक्षा संपली! इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये ओला घालणार धुमाकूळ, पाहा बाईकची पहिली झलक
किंमत किती ?
BSA Gold Star 650 चे वेगवेगळे व्हेरिएंट बाजारात वेगवेगळ्या किमती रेंजसह लाँच करण्यात आले आहेत. ही बाईक Highland Green आणि Insignia Red कलर पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत तीन लाख रुपये आहे. याचा मिडनाईट ब्लॅक आणि डॉन सिल्व्हर कलर ३.१२ लाख रुपयांच्या किमतीसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. या बाईकमध्ये शॅडो ब्लॅक कलरदेखील उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत ३.१६ लाख रुपये आहे. गोल्ड स्टार 650 लाइन-अपची टॉप-एंड लेगसी एडिशन शीन सिल्व्हर भारतीय बाजारपेठेत ३.३५ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह आली आहे.