अलिकडे मार्केटमध्ये दमदार फीचर असलेल्या एसयूव्ही उपलब्ध आहेत. एसयूव्हींमध्ये सनरूफ आणि एडीएएस सारखे सुरक्षा फीचर मिळत असल्याने एसयूव्हीची मागणी वाढली आहे. मात्र त्यांच्या किंमती देखील अधिक आहे. पण तुम्हाला बजेटमध्ये एसयूव्ही घ्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला १० लाखांच्या आता मिळणाऱ्या काही कॉम्पॅक्ट एसयूव्हींची माहिती देणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) मारुती सुझुकी एस प्रेस्सो सीएनजी

Maruti Suzuki S-Presso CNG या एसयूव्ही कारची किंमत ५.९० (एक्स शोरूम) लाखांपासून सुरू होते. या एसयूव्हीमध्ये के सिरीज १.० लिटर इंजिन मिळते जे ५६ बीएचपीची शक्ती निर्माण करते. एलएक्सआय आणि व्हीएक्सआय, अशा दोन व्हेरिएंटमध्ये ही एसयूव्ही मिळते.

(आल्टोपेक्षा लहान असेल MG AIR EV, जाणून घ्या रेंज आणि किंमत)

२) ह्युंडाई व्हेन्यू फेसलिफ्ट

Hyundai Venue facelift ही एसयूव्ही ड्राईव्ह मोड सिलेक्ट फीचरसह मिळते. यात नॉर्मल, इको आणि स्पोर्ट मोड ड्राइव्हिंगचा पर्याय मिळतो. ह्युंडाई व्हेन्यू फेसलिफ्टच्या कप्पा १.२ एमपीआय पेट्रोल व्हर्जनची किंमत ७ लाख ५३ हजार १०० रुपयांपासून सुरू होते.

३) किया सोनेट

kia sonnet ची किंमत ७.१७ लाखांपासून (एक्स शोरूम) सुरू होते. एसयूव्हीमध्ये सुरक्षेसाठी साइड एअरबॅग आणि हायलाईन टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टिम देण्यात आले आहे. तसेच वाहनात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, वेहिकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, ब्रेक असिस्ट, हिल असिस्ट कंट्रोल देण्यात आले आहे.

(टाटाने पंचमधून ‘हे’ महत्वाचे फीचर हटवले, इंधन बचतीवर होणार परिणाम)

४) रेनॉल्ट किगेर

Renault Kiger एसयूव्हीची किंमत ५.८४ लाखांपासून सुरू होते. कारमध्ये मल्टी सेन्स ड्राइव्हिंग मोड, मोठी जागा, कार्गो स्पेस, केबिन स्टोअरेज मिळते.

५) मारुती ब्रिझा

Maruti breeza ची किंमत ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. या एसयूव्हीमध्ये आराम आणि सुविधा देणारे अनेक फीचर्स आहेत. जसे एसयूव्हीमध्ये मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, ऑटो हेडलॅम्प, रिएर एसी वेन्ट, कुल्ड ग्लोबॉक्स, रिएर फास्ट चार्जिंग यूएसबी पोर्ट (ए आणि सी टाईप), टोगल कंट्रोल ऑटो एसी पॅनल आणि ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनसह पॅडल शिफ्टर कंट्रोल्स देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget suv under 10 lack ssb