New Toyota Innova Hycross MPV: टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारात नवी Toyota Innova Hycross MPV लाँच केली आहे. सध्या बाजारात असलेल्या मॉडेलच्या तुलनेत नव्या इनोवा हायक्रॉसमध्ये बरेच बदल केले आहेत. जबरदस्त लूक असलेल्या इनोवा हायक्रॉसमध्ये आरामदायक केबिनसोबत हाइटेक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून या कारचे आता बंपर बुकिंग झाले असल्याची माहिती आहे. पण या कारची तुम्हाला सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टोयोटा इनोव्हा एकूण पाच प्रकारांमध्ये येते – G, GX, VX, ZX आणि ZX(O). अहवालानुसार, ZX आणि ZX(O) – दोन्ही टॉप-स्पेक ट्रिम्स – जास्तीत जास्त बुकिंग मिळवत आहेत.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

Toyota Innova Hycross MPV अशी आहे खास?

Toyota Innova Hycross MPV ही कार सेल्फ चार्जिंग हायब्रीड इलेक्ट्रिक कार आहे. विशेष म्हणजे, सुरू केल्यानंतर पहिल्या अवघ्या ९.५ सेकंदांमध्ये ही कार ताशी १०० किलोमीटर्सचा वेग गाठू शकते. ही कार २०२३ या नवीन वर्षांत, जानेवारी महिन्यापासून उपलब्ध होणार असून तिच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. या कारची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

(हे ही वाचा : अन् ५ डोर Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV प्रजासत्ताक दिनी दाखवणार आपला थरार; किंमत फक्त…)

नव्या इनोवा हायक्रॉस कारमध्ये दमदार हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. एमपीव्हीच्या ग्राहकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. २.० लिटरचं पेट्रोल आणि २.०-लिटरचं पेट्रोल हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. एआरएआयनुसार ही गाडी प्रति लिटर २१.१ किलो मिटरचा मायलेज देते. याचा अर्थ असा की, एकादा टाकी फुल्ल केल्यानंतर ही कार १०९७ किलोमिटर धावेल.

किंमत

टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची किंमत २२ लाख ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. त्याची स्पर्धा महिंद्रा XUV 700 आणि Tata Safari सारख्या कारशी होईल.

Story img Loader