फ्रेंच वाहन निर्माती कंपनी रेनॉल्ट इंडियाने भारतीय ग्राहकांसाठी मोठ्या डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ या महिन्यात, ग्राहकांना भरपूर डिस्काउंट मिळवता येणार आहे. नवीन रेनॉल्ट कार खरेदीवर ३५,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये रेनॉल्ट क्विड, रेनॉल्ट कायगर आणि रेनॉल्ट ट्रायबर या गाड्यांचा समावेश असून कंपनीने या कारच्या खरेदीवर या ऑफर जारी केल्या आहेत. कंपनीच्या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि ग्रामीण सवलत यांचा समावेश आहे. कंपनीची ही ऑफर सर्व मॉडेल्ससाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वैध आहे.

  • रेनॉल्ट ट्रायबर
    रेनॉल्ट ट्रायबर ही भारतीय कार बाजारपेठेतील एकमेव सब ४m एमपीव्ही कार आहे. या कारमध्ये सात प्रवासी सहज बसू शकतात. कंपनी या कारवर या महिन्यात एकूण ३५,००० रुपयांची सूट देत आहे. यामध्ये १०,००० रुपयांची रोख सवलत आणि १५,००० रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि १०,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. त्याचबरोबर ही कार ५९९९ रुपयांच्या ईएमआय मध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.

आणखी वाचा : Toyota Innova HyCross २५ नोव्हेंबरला होणार लाँच; नवीन टीझर रिलीज, एकदा टीझरमध्ये पहा कारचा भन्नाट लूक!

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
  • रेनॉल्ट क्विड
    रेनॉल्ट क्विड दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या हॅचबॅकच्या २०२२ मॉडेलवर या महिन्यात एकूण ३५,००० रुपयांची सूट देत आहे. यामध्ये, रु. १५,००० चे एक्स्चेंज बेनिफिट आणि रु. १०,००० कॉर्पोरेट डिस्काउंट रु. १०,००० कॅश डिस्काउंट आणि स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत दिले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ५,००० रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. यासोबतच क्विड ४,९९९ रुपयांच्या ईएमआय मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • रेनॉल्ट कायगर
    कंपनी या एसयूव्ही वर रु. १०,००० कॉर्पोरेट सवलत आणि स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत रु. १०,०००चे एक्सचेंज लाभ देत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी अतिरिक्त सवलत दिली जात आहे. कंपनी कायगर ६,९९९ रुपयांच्या ईएमआय वर उपलब्ध करून देत आहे.

Story img Loader