पोर्तुगालच्या अझोरेस बेटांच्या किनार्याजवळ ४ हजारांपेक्षा जास्त लक्झरी कार घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग लागली होती. जर्मनीच्या पोर्ट ऑफ एम्डेन येथून रोड आयलंडमधील डेव्हिसव्हिल येथील बंदरावर जात असताना गेल्या १६ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. २१ फेब्रुवारीला आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं होतं. पण हे मालवाहतूक जहाज किनाऱ्यावर आणण्यास अपयश आलं. अखेर दोन आठवड्यानंतर या मालवाहतूक जहाजाला चार हजार लक्झरी गाड्यांसह जलसमाधी मिळाली आहे. पोर्तुगीज अझोरेस द्वीपसमुहाजवळ हे जहाज बुडालं. यामुळे जवळपास ४०० लाख अमेरिकन डॉलर्सचं नुकसान झालं आहे. जहाजाला आग लागली त्याच दिवशी जहाजावरील २२ क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आलं होतं.
पोर्तुगीज अझोरेश बंदरावली कॅप्टनने सांगितले की, “जेव्हा टोईंग सुरू झाले. तेव्हा पाणी आत येऊ लागले आणि जहाजाने स्थिरता गमावली आणि बुडाले.” हे जहाज युरोपमधील बहामा येथे नेणार होते. जहाजाची मालकी असलेली एमओएल शिप मॅनेजमेंट सिंगापूर पीटीई लिमिटेड कंपनीने सांगितले की, पनामा ध्वजांकित जहाज स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता बुडाले. आग लागल्यानंतर फेलिसिटी एस एका बाजूला झुकू लागले आणि पाणी घेऊ लागले. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार १,१०० पोर्चेससह ३,९६५ फोक्सवॅगन एजी वाहने जहाजावर होती. हे जहाज १० फेब्रुवारी रोजी जर्मनीतील एम्डेन येथून निघालं होतं.
युरोपियन कार निर्मात्यांनी जहाजात किती वाहने आणि कोणते मॉडेल होते यावर चर्चा करण्यास नकार दिला आहे. परंतु युनायटेड स्टेट्समधील पोर्श ग्राहकांना त्यांच्या डीलर्सद्वारे संपर्क साधला जात आहे. कंपनीने सांगितले. “आम्ही या घटनेमुळे प्रभावित प्रत्येक कार बदलण्याचे काम करत आहोत आणि नवीन कार लवकरच तयार केल्या जातील,” असं पोर्श कार्स नॉर्थ अमेरिका, इंकचे पीआरचे उपाध्यक्ष एंगस फिटन यांनी असोसिएटेड प्रेसला ईमेलमध्ये सांगितले.