प्रत्येकजण नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहतो, परंतु कमी बजेटमुळे अनेक वेळा तडजोड करावी लागते. मात्र, आता तसे करण्याची गरज भासणार नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकी एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) ही कार कमी बजेटमध्ये कशी खरेदी करु शकता, याविषयी माहिती देणार आहोत. खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता फक्त दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. चला तर जाणून घेऊया या कारवरील फायनान्स प्लॅन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Maruti Suzuki Ertiga किंमत

मारुती सुझुकी एर्टिगाच्या ZX व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ११.२९ लाख रुपये आहे. नोंदणी, विमा आणि इतर खर्च जोडत असताना, ऑन-रोड सुमारे १३ लाख रुपये होतात. अशा परिस्थितीत तुम्ही ही कार दोन लाख रुपयांना कशी खरेदी करू शकता हे आज आपण जाणून घेऊया.

(हे ही वाचा : Car Finance Plan: मारुतीची ‘ही’ दमदार मायलेजवाली कार आणा फक्त ९९ हजारात घरी; एवढा बसेल EMI)

Maruti Suzuki Ertiga Finance plan

जर तुम्हाला मारुती सुझुकी एर्टिगा हा प्रकार विकत घ्यायचा असेल तर कार नोंदणी, विमा, प्रक्रिया शुल्क आणि एक हप्ता २ लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटमध्ये जमा केला जाईल. याशिवाय ११.०७ लाख रुपयांचे कर्ज असेल. यासाठी तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँक किंवा एनबीएफसीशी संपर्क साधू शकता.

जर बँकेचे कर्ज ९ टक्के व्याजदराने असेल आणि त्याचा कालावधी ५ वर्षांचा असेल, तर तुम्हाला दरमहा २२९९० रुपयांचा हप्ता भरावा लागेल.