Honda Activa : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर कडुन फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. होंडा ॲक्टिवावर देण्यात आलेली ऑफर सध्या चर्चेत आहे. या स्कूटरवर झिरो डाउन पेमेंट आणि नो कॉस्ट इएमआय ही आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. यासह ही स्कूटर विकत घेतल्यास त्यावर ५ हजार रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे.

या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरला ग्राहकांची पसंती मिळत आहे. या स्कूटरची मागणी लक्षात घेऊन कंपनीने एक महिना आधी याचे प्रीमियम एडिशन लाँच केले होते. ज्यानंतर याची विक्री आणखी वाढली. होंडा ॲक्टिवा १२५, ॲक्टिवा प्रीमियम आणि ॲक्टिवा डीएलएक्स या तिन्ही व्हेरियंटवर ही आकर्षक ऑफर उपलब्ध आहे.

Jio Launched affordable recharge Plan
Jio Affordable Plan : जिओने गुपचूप लाँच केला स्वस्त रिचार्ज प्लॅन! फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये महिनाभर वापरता येईल इंटरनेट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
Royal Enfield Scram 440 price, features, and specifications in Marathi
नवीन वर्षात Royal Enfield चा धमाका! बुलेटप्रेमींनो धासू Scram 440 लाँच, किंमत फक्त इतकी: जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
Komaki SE series electric scooters
Komaki SE series: सिंगल चार्जवर १२० किलोमीटरपर्यंतची रेंज; सुरक्षेसाठी ‘हे’ फीचर; भारतात लाँच झाली इलेक्ट्रिक स्कूटर

आणखी वाचा : मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६० हजारांपर्यंतची मोठी सूट; पाहा यादी

होंडा ॲक्टिवाचे फीचर्स

  • होंडा ॲक्टिवामध्ये १०९.५ सीसी इंजिन आहे.
  • हे इंजिन ५.७३ ‘केडब्लू’ची पॉवर आणि ८.८४ ‘एनएम’ टॉर्क जनरेट करते.
  • यात ५.३ लीटरची फ्युएल टाकी आहे. त्याचे वजन १०६ किलो आहे.
  • यामध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.
  • या ॲक्टिवाची लांबी १८३३ मिमी, रुंदी ६९७ मिमी आणि उंची ११५६ मिमी आहे. तसेच व्हीलबेस १२६० मिमी आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स १६२ मिमी देण्यात आला आहे.
  • या स्कूटरची एक्स शोरूम किंमत ७५,४०० रुपये आहे.

Story img Loader