Honda Discount Offer: होंडा टू व्हीलर्स इंडियाने (Honda Two Wheelers India)आपल्या टू-व्हीलर रेंजची विक्री वाढवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये कंपनी सध्याच्या स्कूटर आणि बाइक्सच्या रेंजवर कॅशबॅक व्यतिरिक्त झिरो डाउन पेमेंट, आणि ७.९९ टक्क्यांच्या प्रारंभिक व्याजाच्या ऑफर आणल्या आहेत.

काय आहे कंपनीची ऑफर?

Petrol Diesel Price Today On 5th November
Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल किती रुपयांनी झालं स्वस्त? तुमच्या शहरांतील इंधनाचा दर इथे चेक करा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
New record of UPI transactions
UPI Transactions: यूपीआय व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये २३.५ लाख कोटी मूल्याचे १६.५८ अब्ज व्यवहार
Car sales around Diwali has fallen so low this year
Car Sales In Festive Season Low : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांनी गाड्यांकडे फिरवली पाठ; विक्री झाली १८ टक्क्यांनी कमी, नेमकं कारण काय?
silver sales increase in 2024
सोन्यापेक्षा चांदीची मागणी का वाढली? सोन्याच्या विक्रीत घट होण्याची कारणं काय?
250 kg of firecrackers seized in action against firecrackers sellers without license
रस्ते, पदपथांवर विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, २५० किलो फटाके जप्त

होंडा स्कूटर किंवा बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला ५ टक्के पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक कमाल ५ हजार रुपयेच असू शकतो. जो किमान ३०,००० च्या व्यवहारासाठी लागू होईल. याशिवाय, जर तुम्ही फायनान्स करून दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी कंपनी काही अटींसह ३,९९९ रुपये डाउन पेमेंट देखील ऑफर करत आहे. तसेच, वाहनासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची गरज नाही.

(आणखी वाचा : Toyota Innova Hycross: खुशखबर! इनोव्हा हायक्रॉसचे प्री-बुकिंग सुरू; ‘या’ दिवशी होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स )

कॅशबॅकसाठी कंपनीने स्टँडर्ड चार्टर्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक, वन कार्ड यांसारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. या वित्त योजना निवडक डीलरशिपवर उपलब्ध असतील, ज्या ३० नोव्हेंबरपर्यंत वैध असतील, असे कंपनीचे सांगितले आहे.