वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण पाहता सरकारची पावले आता कडक होत आहेत. कार इंजिनशी संबंधित नवीन प्रगत उत्सर्जन मानदंड एप्रिलपासून देशभरात सुरू होणार आहे. सर्व कंपन्यांनी या नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सरकारचे हे पाऊल देशातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठीही आहे. नवीन उत्सर्जन मानकांना RDE म्हणजेच रिअल ड्रायव्हिंग एमिशन म्हणून देखील ओळखले जाते. हे नवीन नियम BS6 उत्सर्जन नियमांचे फेज 2 आहेत. मात्र, त्याचा परिणाम वाहनांच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.

जानेवारीमध्ये अनेक कंपन्यांनी वाढवल्या कारच्या किमती

विशेष म्हणजे, जानेवारीमध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती वाढवल्या होत्या. त्यामुळे आता एप्रिलमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या किमती वाढणार आहेत. Kia India देखील सेल्टोस, सॉनेट आणि केरेन्सच्या किमती ५० हजार रुपयांनी वाढवू शकते. जानेवारीमध्ये Kia India ने Seltos, Sonnet आणि Carens ५०,००० रुपयांनी महाग केले होते. त्यांनी सेलटोसच्या डिझेल मॉडेलवर ५० हजार रुपये आणि पेट्रोल मॉडेलवर ३५ हजार रुपयांची वाढ केली होती. त्याचवेळी Sonnet च्या डिझेल मॉडेलवर ४० हजार आणि पेट्रोल मॉडेलवर २५ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
rupali bhosale buys new mercedes car
मर्सिडीज खरेदी करुन रुपाली भोसलेने नेटकऱ्याची केली बोलती बंद! गाडीवरून ट्रोल करणाऱ्याला ७ आठवड्यांपूर्वीच दिलेलं उत्तर
Honda new year discount honda car offers upto 90,000 discount in January
HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत
Kia Syros Bookings Start Tonight
Kia Syros : थ्री इंजिन पर्याय, ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स अन् बरेच काही; टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही

(हे ही वाचा : धूम मचाले धूम..! तरुणाईला वेड लावणारी ‘ही’ पॉवरफुल बाईक आली बाजारात, ‘या’ दिवशी बुकिंग सुरू )

दुसरीकडे, कारबद्दल बोलायचे झाले तर, कॅरेन्सच्या डिझेल मॉडेलमध्ये ४५ हजार रुपयांनी तर पेट्रोल मॉडेलवर २५ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता नवीन नियमांमुळे एप्रिलमध्ये सेल्टोसच्या डिझेल मॉडेलवर ५० हजार रुपये आणि पेट्रोल मॉडेलवर ४० हजार रुपयांची वाढ होऊ शकते. त्याचवेळी सोनेटच्या डिझेल मॉडेलवर ४५ हजार रुपये आणि पेट्रोल मॉडेलवर ३० हजार रुपयांची वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे केरेन्सच्या डिझेल मॉडेलवर ५०,००० रुपये आणि पेट्रोल मॉडेलवर ३०,००० रुपयांची वाढ केली जाऊ शकते. लवकर खरेदी केल्यास तुमच्या पैशांची बचत होणार.

Story img Loader