देशाच्या टू-व्हीलर सेक्टरमध्ये स्पोर्ट्स बाईक सेगमेंटची नेहमीच चांगली मागणी राहिली आहे. त्यापैकी ‘KTM Duke 125’ या शानदार स्टाइल आणि दमदार स्पीडसाठी ग्राहकांची पसंती असणाऱ्या स्पोर्ट्स बाईकबाबत आज सांगणार आहोत. किंमत जास्त असल्यामुळे इच्छा असूनही अनेकजण स्पोर्ट्स बाईक खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे आज फक्त ३० हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही बाईक खरेदी करण्याच्या प्लॅनबाबत जाणून घेऊया.
KTM 125 Duke किंमत
KTM 125 Duke ची किंमत १,७८,०४१ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही किंमत ऑन-रोड असताना २,०४,११० रुपयांपर्यंत जाते. या किंमतीनुसार ही बाईक घेण्यासाठी तुमचे बजेट २ लाख रुपये असणे आवश्यक आहे. मात्र, तुम्हाला ही बाईक ३० हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार आहे.
(हे ही वाचा : स्पोर्टी लूक, अन् हायटेक फीचर्सवाली Hyundai ची ‘ही’ कार फक्त 55 हजारात आणा घरी; महिन्याला भरा केवळ ‘इतका’ EMI)
KTM 125 Duke Finance plan
ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुमच्याकडे ३०,००० रुपये असल्यास, बँक या बाईकसाठी १,७४,११० रुपये कर्ज देऊ शकते.
एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला KTM 125 Duke च्या डाउन पेमेंटसाठी ३०,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने ठरविल्यानुसार ३ वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला ५,५९४ रुपये मासिक EMI भरावे लागेल.