Affordable Cars: अनेक लोकांची कार घेण्याची इच्छा असते. मात्र, कमी बजेटमुळे अनेक लोक कार घेण्याचं टाळतात. जर तुमचाही बजट कमी आहे आणि तुम्ही चांगले फीचर्स असलेले कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण काही सेंकड हँड कारबद्दल आपण माहिती जाणून घेऊया ज्या तुम्हाला स्वस्तात घेता येणार आहे. Cars24 या सारख्या लोकप्रिय साईडवर तुम्हाला अगदी स्वस्तात या कार घेता येणार आहे.
‘या’ कार आहेत स्वस्तात उपलब्ध
Maruti Alto STD
मारुती ट्रू व्हॅल्यूमध्ये वापरलेले अल्टो एसटीडी मॉडेल हे २००७ मधील मॉडेल आहे. ही कार ८५,००० रुपयांमध्ये सुचीबद्ध आहे. या कारने ८५,८०८ किलोमीटरचे अंतर कापले आहे आणि ही कार शिमल्यात नोंदणीकृत आहे. तुम्हाला या कारशी संबंधित सर्व आवश्यक माहिती True Value वर मिळेल.
(हे ही वाचा : अन् 350cc सेगमेंटमध्ये ‘या’ बाईक्सने घातला धुमाकूळ; लूक,आणि मायलेज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात)
Hyundai i10
महिंद्रा फर्स्ट चॉईसवर ह्युंदाई i10 MAGNA उपलब्ध आहे. ही कार १.९५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. या कारने ७२,५३१ किलोमीटर अंतर गाठले आहे.
Maruti WagonR VXI
२०१९ चे मॉडेल असलेले WagonR LXi ब्राउन मारुती ट्रू व्हॅल्यूवर ब्राउन रंगात उपलब्ध आहे. या कारने आतापर्यंत २५,०८५ किमी अंतर गाठले आहे. या कारची किंमी ५४,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे.