मारुती सुझुकी कंपनी आपल्या किफायतशीर आणि मायलेज कारसाठी देशात ओळखली जाते. यामुळे मारुती सुझुकी ही देशातील सर्वात यशस्वी कार कंपनी देखील आहे. मारुतीच्या अनेक कार सीएनजीमध्येही बाजारात उपलब्ध आहेत. सीएनजी लाईनअपमध्ये WagonR, Celerio, Swift, Dezire, Alto सारख्या अनेक गाड्या आहेत, पण त्यापैकी WagonR ची सर्वाधिक विक्री होते. WagonR CNG LXI आणि VXI या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यांच्या एक्स-शोरूम किमती अनुक्रमे ६.४५ लाख आणि ६.८९ लाख रुपये आहेत.
ही कार सीएनजीवर चालण्यासाठी खूप किफायतशीर आहे आणि एक परिपूर्ण फॅमिली कार आहे. ही कार ३४.०५ किमी/किलो पर्यंतचं मायलेज देते. तुम्हालाही WagonR CNG खरेदी करायची असेल, तर आम्ही तुम्हाला या कारवरील फायनान्स प्लान आणि EMI पर्यायांबद्दल माहिती देत आहोत.
(हे ही वाचा:परदेशातही वाजणार ‘या’ मेड इन इंडिया दुचाकी कंपनीचा डंका, १४ उत्पादने करणार लाँच!)
WagonR CNG LXI EMI
Maruti Suzuki WagonR LXI CNG ची किंमत ६.४५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर ऑन रोड किंमत ७ लाख २९ हजार ३८२ रुपये आहे. हा सीएनजी प्रकार खरेदी करण्यासाठी तुम्ही १ लाख रुपये डाउनपेमेंट केल्यास, तुम्हाला उर्वरित ६ लाख २९ हजार ३८२ रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.
जर तुम्ही कारला ५ वर्षांसाठी फायनान्स केले तर तुम्हाला त्यावर ९ टक्के वार्षिक व्याजदर द्यावा लागेल, ज्यासाठी तुम्हाला पुढील ६० महिन्यांसाठी दरमहा १३,०६५ रुपये EMI म्हणून भरावे लागतील. WagonR च्या किफायतशीर LXI CNG प्रकाराच्या खरेदीवर, तुम्हाला १.५४ लाख रुपये अतिरिक्त व्याज द्यावे लागेल.
सुचना : जर तुम्ही फायनान्ससह कोणतेही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कार खरेदी करण्यापूर्वी, डीलरशिपवर फायनान्स प्लॅन आणि ईएमआयबद्दल संपूर्ण तपशील तपासून घ्या.