देशाच्या बाजारपेठेत दररोज एक उत्तम कार लाँच केली जाते. पण अनेक लोकांकडे नवीन कार घेण्यासाठी पुरेसे बजेट नसते. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण या बातमीत आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार ४० हजारात कसे खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत.
मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार Maruti Suzuki Alto K10 असे या कारचे नाव असून तुम्ही ही कार फक्त ४०,००० रुपयांमध्ये तुमच्या घरी आणू शकता. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे या कारचे मायलेज ३३ kmpl पेक्षा जास्त आहे.
(हे ही वाचा : Hero चा खेळ संपविण्यासाठी Bajaj चा नवा डाव! पेट्रोल अन् डिझेलशिवाय धावणारी आणतेय बाईक, किंमत… )
किंमत आणि EMI
मारुती सुझुकी अल्टो K10 ची किंमत ३.९९ लाख पासून सुरू होते आणि ५.९५ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाऊ शकते. जर तुम्हाला या कारचा बेस व्हेरिएंट डाऊन पेमेंटवर खरेदी करायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी त्याचे EMI कॅल्क्युलेटर घेऊन आलो आहोत.
जर तुम्ही ही कार १० टक्क्यांच्या डाउन पेमेंटने खरेदी केली, म्हणजे तुम्ही बेस व्हेरियंटसाठी सुमारे ४०,००० भरले, तर तुम्हाला ९.५ टक्के व्याज दरासह ५ वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे ७,५०० चा EMI भरावा लागेल.
इंजिन आणि मायलेज
मारुती अल्टो K10 ला १-लिटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन (६७ PS आणि ८९ Nm) मिळते. पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ५-स्पीड एएमटी गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहे. येथे विशेष बाब म्हणजे, यामध्ये CNG किटचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे इंजिन ५७ PS आणि ८२.१ Nm जनरेट करते. पेट्रोल मोडमध्ये त्याचे मायलेज २४.९० किमी/लि. पर्यंत आहे, तर सीएनजीसह ते ३३.८५ किमी/किलोपर्यंत मायलेज देते.