जर तुम्ही Royal Enfield Classic 350 खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट कमी असेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्येही ही बाईक खरेदी करून कसे घरी आणू शकता, हे सांगणार आहोत. खरं तर, Royal Enfield Classic 350 चे सेकंड हँड मॉडेल आजकाल बाजारात खळबळ माजवत आहे, जे खरेदी करून तुम्ही पैसे वाचवू शकता जी तुमच्यासाठी सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही. तुम्ही ही बाईक ४५,००० रुपयांना खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता, ही एका मोठ्या संधीपेक्षा कमी नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Royal Enfield Classic 350 बाईकची किंमत

जर तुम्ही शोरूममधून रॉयल एनफिल्डचे क्लासिक 350 मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बाईक तुम्ही शोरूममधून सुमारे २ लाख रुपयांना खरेदी करून घरी आणू शकता. पण तुम्ही हीच सेकंड हँड बाईक खरेदी करुन तुमचे पैसे वाचवू शकतात.

(हे ही वाचा : Maruti Brezza चा गेम होणार? देशात येतेय नवी CNG SUV कार, मायलेज ३० किमी अन् किंमत…)

क्लासिक 350 मॉडेल विक्रीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे, ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. त्याची किंमत देखील खूप कमी आहे, जी एकूण ४५,००० रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. बाईकचे मायलेज आणि फीचर्सही खूप चांगले आहेत.

येथून करा बाईक खरेदी

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे मॉडेल क्विकर साइटवर विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. बाईकच्या मॉडेलबद्दल बोलायचे तर २०१४ ची आहे, ज्याची नोंदणी दिल्लीची आहे. ही बाईक तुम्ही एकूण ४५,००० मध्ये खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची वित्त योजना दिली जाणार नाही.