रॉयल एनफील्ड कंपनीच्या रेट्रो आणि क्रूझर बाईक्सचा भारतात एक मोठा चाहतावर्ग आहे. बुलेटची क्रेझ तर कॉलेज कुमारांपासून ते साठीतल्या आजोबांपर्यंत सगळ्यांमध्येच पाहायला मिळते. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडेही एक बुलेट असायला हवी. परंतु या बुलेटची किंमत जास्त असल्यामुळे सर्वसामान्यांना घेणे ते परवडत नाही. मात्र, आता चिंता करु नका आज आम्ही तुम्हाला अशा बाईकबद्दल सांगणार आहोत, ज्या खरेदी करून तुम्हाला बुलेटसारखे वाटेल. चांगली गोष्ट म्हणजे, या बाईकची किंमत खूपच कमी आहे आणि मायलेजही खूप चांगले आहे.
Royal Enfield Hunter 350: नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 ही सध्या कंपनीची सर्वात स्वस्त बाईक आहे आणि सर्वात जास्त विकली जाणारी मोटरसायकल आहे. Royal Enfield Hunter 350 मध्ये ३४९cc, सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑइल-कूल्ड, इंधन-इंजेक्ट इंजिन आहे. इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हंटर 350 ची किंमत १.५० लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम)
(हे ही वाचा : नवीन बाईक घ्यायचीये? थोडी वाट पाहा; २०२३ मध्ये परडणाऱ्या किमतीत ‘या’ ९ सुपरबाईकची होणार एंट्री)
Bajaj Avenger 160 Street: The Avenger 160 Street ही बजाजची सर्वात परवडणारी क्रूझर आहे. यात आरामदायी राइडिंग पोझिशन आहे. या रेट्रो मोटरसायकलच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये लांब व्हीलबेस आणि फॉरवर्ड-फेसिंग फूटपेग स्थिती समाविष्ट आहे. हे १६०cc इंजिनद्वारे समर्थित आहे जे १४bhp आणि १३.७Nm टॉर्क निर्माण करते. बाईकची किंमत १.१२ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Bajaj Avenger Cruise 220: ही Street 160 ची मोठी आवृत्ती आहे आणि त्यामुळे मोठ्या इंजिन आणि स्टाइलसह येते. याला आजूबाजूला भरपूर क्रोम आणि हेडलॅम्पच्या वर एक मोठी विंडस्क्रीन देखील मिळते. हे २२०cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे. पीक पॉवर आउटपुट १८.७bhp आहे आणि पीक टॉर्क १७.५Nm आहे. Avenger Cruise 220 ची किंमत १.३८ लाख रुपये आहे.
(हे ही वाचा : ‘या’ आलिशान कारची भारतात डिमांड; खरेदीसाठी लोकांनी लावल्या रांगा, झाली ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री )
Yezdi Roadster: या यादीतील ही सर्वात महागडी बाईक आहे. त्याची सुरुवातीची किंमत २ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे ३३४ सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड DOHC इंजिनसह येते. हे इंजिन ७,३०० RPM वर २८ bhp पॉवर आणि ६,५०० RPM वर २९ Nm पीक टॉर्क विकसित करते.
Komaki Ranger: इलेक्ट्रिक क्रूझर शोधत आहेत त्यांच्यासाठी कोमाकी रेंजर हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोमाकी रेंजरमध्ये ४kWh बॅटरी पॅक आणि ५.३bhp पॉवर निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. त्याची किंमत सुमारे १.७४ लाख (एक्स-शोरूम) आहे. याला प्रति चार्ज रेंज १८०-२०० किमी मिळते. बाईकची किंमत रु. १.७४ लाखांपासून सुरू होते.