Hero Bike Offers: चांगला मायलेज देणाऱ्या बाईक्सची मोठी रेंज भारताच्या टू-व्हीलर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. देशात सर्वात जास्त बाईक विकणारी कंपनी ‘हीरो मोटोकॉर्प’कडेही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारे काही चांगल्या बाईक्स आहेत. आज आम्ही तुम्हाला हीरोची बजेट सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक ‘Hero Passion Pro’ बाबत सांगत आहोत. हिरोची ही बाईक चांगला मायलेज देतेच, शिवाय दिसायलाही आकर्षक आहे. तुम्हाला ही बाईक २०,००० रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Hero Passion Pro ‘या’ वेबसाइटवर स्वस्तात उपलब्ध

बाजारात नवीन Hero Passion Pro ची किंमत ८७,१३८ आहे. मात्र, Droom.In वर ही सेंकड हँड बाईक तुम्हाला २० ते ३० हजारांच्या रेंजमध्ये घेता येणार आहे. Hero Passion Pro चे २०१३ चे मॉडेल ७५,००० किमी पर्यंत चालविलेले आहे. २९,०५० मध्ये हे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

(हे ही वाचा : २५ हजारामध्ये खरेदी करा ८० kmpl पर्यंत मायलेज देणारी ‘ही’ जबरदस्त बाईक; पाहा कुठे मिळतेय शानदार डील )

Hero Passion Pro ‘अशी’ आहे खास

Hero Passion Pro मध्ये कंपनीने सिंगल सिलेंडरयुक्त ११३ सीसीचं एअर कूल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन ९.१५ पीएस पॉवर आणि ९.८९ एनएम टॉर्क जनरेट करतं, इंजिनसोबत ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. बाइकच्या ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास डिस्क व्हेरिअंटमध्ये फ्रंट व्हीलसाठी २४० एमएम डिस्क ब्रेक आणि रिअर व्हीलसाठी १३० एमएम ड्रम ब्रेक आहे, यासोबत ट्यूबलेस टायरही मिळतात. ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये ७० किलोमीटर इतका शानदार मायलेज देते.

Story img Loader