Second Hand Bike: हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर (Super Splendor) ही बाईक गेल्या अडीच दशकांपासून भारतीय रस्त्यांवर रुबाबात मिरवतेय. ही देशातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री झालेली बाईक आहे. दर महिन्याला कंपनी या बाईकच्या सरासरी २ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करते. ही बाईक तिच्या इंजिन आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. ही बाईक तुम्हाला स्वस्तात घेता येणार आहे.

जर तुम्ही शोरूममधून Hero Super Splendor खरेदी केले तर त्यासाठी तुम्हाला ७९,११८ रुपये ते ८३, २४८ रुपये खर्च करावे लागतील. जर तुमच्याकडे हे बजेट नसेल तर कोणतीही अडचण नाही, तुम्ही हिरो सुपर स्प्लेंडरच्या सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती येथे जाणून घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक अर्ध्याहून कमी किमतीत मिळू शकते. हिरो सुपर स्प्लेंडरच्या सेकंड हँड मॉडेल्सवर आढळणारे हे आॅफर सेकंड हँड वाहनांची विक्री आणि खरेदी करणाऱ्या वेबसाइट्सवरून घेतले आहेत.

Modak Recipe Modak without Mold Talniche modak recipe in marathi
बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा तळणीचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
lokmanas
लोकमानस: बाजार हा क्रूर शिक्षक!
two people robbed young man in akshmi road pune
पुणे: लक्ष्मी रस्त्यावर तरुणाला मारहाण करून तीन लाखांची रोकड लूट
Pimpri Chinchwad,pimpri chinchwad pistols seize, Sangavi Police, pistols, live cartridges, arrest, illegal arms sale, investigation,, Arms Act
पिंपरी- चिंचवड: सांगवीत पोलिसांनी जप्त केली पिस्तुल, जिवंत काडतुसे; शस्रे कोणाला विकली जात आहेत ? तपास सुरु…
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
best valley of flowers to visit during monsoon season
सफरनामा : ‘पुष्प’ राज

(हे ही वाचा : Hyundai Creta ‘इतक्या’ स्वस्तात आणा घरी; जाणून घ्या भन्नाट ऑफर! )

ऑनलाईन साईट्सवरील ‘या’ ३ बेस्ट ऑफर तपासून पाहा

OLX

सेकंड हँड हिरो सुपर स्प्लेंडरची आजची पहिली आणि स्वस्त डील OLX वेबसाइटवर उपलब्ध आहे. हिरो सुपर स्प्लेंडरची २०१२ ची मॉडेल यादी येथे आहे. या बाईकची नोंदणी दिल्लीची असून किंमत १५,००० रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा योजना दिली जाणार नाही.

DROOM
दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवरून घेतली आहे. या बाईकची २०१४ च्या मॉडेलची यादी येथे आहे, ज्याची किंमत २०,००० रुपये ठेवण्यात आली आहे. बाईकची नोंदणी दिल्लीची आहे आणि या बाईकसोबत फायनान्स प्लॅनही उपलब्ध असेल.

QUIKR

दिल्ली नंबर प्लेटसह सुपर स्प्लेंडरची २०१५ मॉडेलची यादी येथे उपलब्ध आहे ज्याची किंमत २५००० रुपये आहे. या बाईकसोबत कोणतीही ऑफर किंवा योजना दिली जाणार नाही.