Most Affordable Electric Car in India: इलेक्ट्रिक कार असं नुसतं ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर एक महागडी कार उभी राहते. इलेक्ट्रिक कारच्या किंमती ही एक मोठी समस्या आहे. इलेक्ट्रिक कार या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कारच्या तुलतेन खूप महाग असतात. त्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार खरेदी करायची इच्छा असूनही पेट्रोल-डिझेलवर चालणारी कार निवडतात. मात्र, आता ही परिस्थिती बदलू शकते. कारण आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहोत. यात तुम्हाला इलेक्ट्रिक कार अगदी स्वस्तात घेता येणार आहे.

‘ही’ इलेक्ट्रिक कार घ्या स्वस्तात

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

येत्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये एक जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. ही कार तुम्ही फक्त ५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. या इलेक्ट्रिक कारचे नाव Strom R3 असे असून ही जबरदस्त इलेक्ट्रिक कार तुम्ही फक्त १०,००० रुपयांच्या टोकन रकमेवर बुक करू शकता. ही कार ग्राहकांना एका चार्जवर तब्बल २००km रेंज देणार आहे. चला तर जाणून घ्या या जबरदस्त कारबद्दल संपूर्ण माहिती.

(आणखी वाचा : सिंगल चार्जवर मिळेल ४८१ किमी पर्यंतची रेंज; उद्यापासून करा ‘या’ इलेक्ट्रिक कारचे बुकिंग! )

फीचर
Storm R3 च्या किंमतीबद्दल कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. पण, सूत्रांच्या माहितीनुसार या कारची किंमक ४.५ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. या साधारण किंमतीवर कार लॉन्च केली जाऊ शकते. असे झाल्यास इतर महागड्या इलेक्ट्रिक कारना बाजारात ही कार मोठी टक्कर देईल. लहान आकार आणि किमतीमुळे हे वाहन लोकांमध्ये खूप लोकप्रिय होऊ शकते. भारतात ही कार नवीन डिझाइनसह लॉन्च केली जाईल जे खूप आकर्षक असेल.

Strom R3 चे ‘हे’ आहे खास वैशिष्टय

या वाहनाचे वैशिष्टय म्हणजे ते तीन चाकी असेल आणि त्यात दोन जण सहज बसू शकतील. यासोबतच कंपनीने यामध्ये सनरूफही दिले आहे. हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येईल. या वाहनाची खासियत म्हणजे त्याचे डायमंड कट डिझाइन. अतिशय मस्त लुक असलेले हे एक अल्ट्रा कॉम्पॅक्ट वाहन असेल जे शहरात चालवणे खूप सोपे असेल.
या EV मध्ये ४८-व्होल्टची इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल, जी १५ kW पॉवर जनरेट करेल. कारचा टॉर्क ९०Nm असेल. ते तीन तासांत पूर्णपणे चार्ज होईल आणि त्यानंतर ते २०० किमी अंतर कापू शकते. कंपनीच्या मते, कारचा टॉप स्पीड ८० किमी आहे. R3 प्रथम दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये लॉन्च होईल. यानंतर ती इतर शहरांमध्ये लॉन्च केली जाईल.

Story img Loader