Best Electric Scooter in India: भारतीय ऑटोमोबाइल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहता खासकरुन दुचाकी वाहनांच्या सेगमेंट ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढताना दिसत आहे. अनेक कंपन्या आता भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहेत. जर तुम्हीही एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरबाबत माहिती देणार आहोत ज्यांची केवळ फीचर्स पाहून तुम्ही ती खरेदी कराल.
‘या’ आहेत बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर
Ola S1 आणि Ola S1 Pro
भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओलाच्या स्कुटरची सर्वात जास्त विक्री होते. कंपनीच्या Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी आहे. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाईन Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सारखीच आहे. यात एलईडी डीआरएल, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी टेललाइटसह एलईडी हेडलॅम्प मिळतात. Ola S1 प्रकारात २.९८KWh बॅटरी पॉवर पॅक आणि Ola S1 चा टॉप स्पीड ९० प्रति तास किलोमीटर आहे, तर किंमत ८५,०९९ रुपये आहे.Ola S1 Pro प्रकारात ८.५KWh इलेक्ट्रिक मोटर आणि ३.९७KWh बॅटरी पॉवर पॅक देण्यात आला आहे. Ola S1 Pro चा टॉप स्पीड ११५ किलोमीटर प्रति तास आहे. तर Ola S1 Pro ची किंम ११०,१४९ रुपये आहे.
(आणखी वाचा: SUV ची कमाल! ‘ती’ पाच मुलांची आई पोहोचली केरळहून थेट Fifa World Cup कतारला! )
TVS आणि Qube ST
टीव्हीएस मोटर (TVS Motor) कंपनीची TVS आणि Qube ST या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला ४.४ kW हब-माउंटेड BLDC मोटरसह ४.५६ kWh लिथियम आयन फिक्स्ड बॅटरी मिळेल.रेंजबद्दल सांगायचे झाले, तर ते १४५ किमी/से. TVS i Qube ST इलेक्ट्रिक स्कूटर ही TVS इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमधील सर्वोत्तम स्कूटर आहे. ही स्कुटर तुम्ही केवळ ९९९ रुपयांमध्ये बुक करू शकता.
बाऊन्स इन्फिनिटी ई-1
कंपनीने या Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये LED प्रोजेक्टर हेडलँप, LED हेडलाइट, १२-लिटर बूट स्पेस आणि हायड्रॉलिक सस्पेंशन आणि डिजिटल स्पीडोमीटर दिले आहेत. यात जिओफेन्सिंग, ड्रॅग मोड, रिव्हर्स मोड, क्रूझ कंट्रोल, अँटीथेफ्ट, टो अलर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला ४८V/39Ah लिथियम-आयन बॅटरीसह BLDC मोटर मिळेल. त्याचबरोबर स्कुटरचा टॉप स्पीड ६५ किमी/तास आहे. ही स्कूटर ८ सेकंदात ० ते ४० किमी/तास वेगाने धावते. १ सिंगल चार्जमध्ये सुमारे ८५ किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज दिली जात आहे.