प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे एक चांगली फोर व्हिलर असावी. तसेच भारतामध्ये कार खरेदी करणे ही एक विशेष प्रक्रिया आहे. नवीन कार घरी आणण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते यासाठी इथे प्रक्रिया हा शब्द वापरण्यात आला आहे. या मध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. नवीन कार खरेदी करणे ही खूप आनंदाची गोष्ट असते. आज आपण कार खरेदी करत असताना कोणत्या पाच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक हे ते पाहुयात. या गोष्टींमुळे तुम्हाला आर खरेदी करणे थोडे सोपे ठरू शकते.
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कारची आवश्यकता आहे?
सर्वात पहिल्यांदा कार खरेदी करत असताना ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की आपल्या कोणत्या प्रकारची कार खरेदी करायची आहे. आपले कुटुंब, रोजचे रनिंग, चालवण्याची पद्धत आणि तुमचे बजेट किती आहे त्यावर हे ठरवावे. हॅचबॅक कार्समध्ये (वॅगनआर, टियागो, ग्रँड i10 निओस, स्विफ्ट, अल्ट्रोझ, i20 आणि बलेनो आणि अन्य हॅचबॅक कार्स ) , तसेच सेडानमध्ये (डिझायर, ऑरा, अमेझ आणि अन्य ) खरेदी करायची आहे का ते ठरवा. हॅचबॅक आणि सेडाननंतर SUV मध्ये (पंच, आगामी एक्स्टर, ब्रेझा, Nexon, सफारी , क्रेटा, सेल्टोस, ग्रँड विटारा, सफारी, XUV700, फॉर्च्युनर इ.) तर MPV मध्ये (Triber, Ertiga, XL6, Carens, Innova क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस इ.). या पर्यायांमधील तुम्हाला कोणती कार खरेदी करायची आहे ते आधी ठरवावे लागेल. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.
हेही वाचा : लॉन्चिंगपूर्वीच मारुती सुझुकीच्या Invicto चे डिझाईन झाले लीक, संपूर्ण डिटेल्स एकदा पहाच
योग्य डील शोधावे.
तुम्हाला कोणती कार खरेदी करायची आहे हे निश्चित झाल्यावर तुमच्या जवळपास असलेल्या जास्ती जास्त डीलर्सना भेट द्या. उदाहरणार्थ तुम्ही i20 घेण्याचे ठरवले तर चांगले डील मिळवण्यासाठी तुम्ही तीन ते चार ह्युंदाईच्या डिलर्सकडे संपर्क साधा. प्रत्येक डीलर तुम्हाला काहीतरी अतिरिक्त ऑफर करेल. तसेच कार खरेदी करत असताना त्याची ऑन रोड किंमत तपासावी. यामध्ये कारची किंमत, रजिस्ट्रेशन कॉस्ट, रोड टॅक्स , इन्शुरन्स , फास्टटॅग आणि इतर चार्जेसचा समावेश असतो. तसेच डीलर्स अॅक्सेसरीजची किंमत देखील ऑन रोड किंमतीमध्ये जोडतात. त्यातील तुम्हाला काही नको असल्यास तुम्ही ते काढून टाकण्यास सांगू शकता.
कारचे बुकिंग
कार खरेदी करत असताना लक्ष घेण्यासारखा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कारचे बुकिंग करणे. यामध्ये थोडीशी सावधानता बाळगली पाहिजे. डीलरने तुम्हाला कारमध्ये कॉम्प्लिमेंट्री म्हणून जे की देण्याचे आश्वासन दिले आहे ते बुकिंग पावतीवर नमूद करून घ्यावे. हे अत्यंत महत्वाचे आहे. बुकिंग पावतीवर ते नमूद न केल्यास डीलर कारच्या डिलिव्हरीवेळी तुमच्या कारमध्ये ते देण्यास नकार देऊ शकतो. तसेच यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कारचे बुकिंग करत असतां बुकिंग रद्द करण्याची र्र्कम देखील तपासून घ्यावी. पावतीवर त्याचा उल्लेख तपासावा. जर का काही कारणास्तव तुम्हाला कारचे बुकिंग रद्द करावे लागले तर डीलर तुम्हाला बुकिंग केलेल्या रकमेतील किती रक्कम परत करणार आहे हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
कार खरेदी करणे
जेव्हा तुमची कार डिलरकडे पोहोचेल तेव्हा पूर्णपणे ते तपासून घ्यावे. म्हणजेच डिलिव्हरी आधीचे निरीक्षण (PDI) करावे. तुमच्या कारमध्ये काही दोष किंवा डॅमेज पार्ट नाही आहे ना ते तपासण्याची देखील संधी यामुळे उपलब्ध होते. कारण एकदा कार रजिस्ट्रेशनसाठी गेल्यास तिथे तुम्हाला काहीही बदल करता येणार नाही. PDI च्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला वाहन नाकारण्याचा किंवा तुमचे बुकिंग रद्द करण्याचा अधिकार आहे. तसेच डीलर तुम्हाला परतावा देण्यास देखील बांधील आहे. तसेच तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीबाबत समाधानी नसल्यास तुम्ही पॉलिसी काढणाऱ्याला तो बदलण्याची विनंती करू शकता . तसेच स्वतंत्रपणे इन्शुरन्स काढू देखील शकता.
डिलिव्हरी मिळण्याचा दिवस
कारची डिलिव्हरी ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. काही राज्यांमध्ये तात्पुरता देण्यात आलेल्या नंबरवर वाहन चालवणे बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुमच्या राज्यातील जिल्ह्यातील स्थानिक कायदे काय आहेत याची माहिती घ्यावी. तसेच डिलिव्हरी घेत असताना डिलरने तुम्हाला सर्व पेमेंटबद्दलच्या सर्व पावत्या आणि इतर सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात दिल्याची देखील खात्री केली पाहिजे. तसेच डिलिव्हरी घेताना कारमध्ये कंपनीकडून प्रदान केलेल्या टूल किटसह अनिवार्य स्पेअर व्हील आहे का ते तपासावे. तथापि, तुमचे वाहन रन-फ्लॅट टायर्सवर चालत असल्यास कंपनी कदाचित स्पेअर प्रदान करणार नाही किंवा स्पेस-सेव्हर व्हील देऊ शकतो.