Second hand car : भारतात तुम्हाला स्वस्त कारांपासून महागड्या कारांची मोठी लिस्ट दिसून येईल. यामध्ये तुम्ही हॅचबॅक कारांपासून लक्झरी एसयुव्ही कारांचा समावेश आहे. हॅचबॅक कार्स या ३.५ लाखांपासून सुरू होतात पण भरपूर असे लोक आहेत, ज्यांचा कार खरेदी करण्यासाठी चार लाखांचा बजेट नसतो. तुमचा सुद्धा कार खरेदी करण्याचा बजेट नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण तुमच्यासाठी सर्वात चांगला एक पर्याय आहे तो म्हणजे सेकंड हॅन्ड कार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सेकंड हॅन्ड कार खरेदी करावी की नाही? आज आपण सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही सांगणार आहोत.

सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना हा व्यव्हार फायद्याचा ठरेल ती तोट्याचा ठरेल, हे कारांवर अवलंबून राहते. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
vehicle also emit white smoke constantly
तुमच्याही वाहनातून सतत पांढरा धूर निघतो? ही समस्या का उद्भवते याची कारणे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
harsh goenka 600 daily saving post
Harsh Goenka Social Post: “दिवसाला ६०० रुपयांची बचत करा”, हर्ष गोएंकांचा सल्ला; नेटिझन्सची आगपाखड, तर नोकरदारांनी मांडला हिशेब!
Ajit Doval
Ajit Doval : अमेरिकेतील न्यायालयाचं भारत सरकार व अजित डोवालांना समन्स, नेमकं प्रकरण काय?
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”

हेही वाचा : Renault : १५ सुरक्षा फीचर्ससह अपघातांचा धोका होणार कमी; ‘या’ तीन स्पेशल एडिशन खरेदी करण्याची तुमच्याकडे नामी संधी

सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचे फायदे

कमी किंमत – नवीन कार खरेदी करण्याच्या तुलनेत तुम्हाला सेकंड हॅन्ड कार अर्ध्या किंमतीत मिळेल ज्यामुळे तुम्हाला बजेटविषयी काळजी वाटणार नाही.

घसारा – सेकंड हॅन्ड कारची आधीच किंमत कमी असते त्यामुळे तुम्हाला कारच्या किंमतीमध्ये होणाऱ्या घसरणीची काळजी नसते.

कमी विमा प्रिमियम – तुम्ही जेव्हा सेकंड हँड कारचा विमा काढता तेव्हा तुम्हाला नवीन कारच्या तुलनेत जवळपास अर्धा प्रीमियम भरावा लागतो

कमी आर्थिक दबाव – सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी तुमच्यावर कोणताही तुम्हाला कर्ज घेण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या बचतीतून अगदी कमी बजेटमध्ये कार खरेदी करू शकता. सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी तुम्ही फायनान्स योजनांचा लाभ घेतात.

हेही वाचा : तुमच्याही वाहनातून सतत पांढरा धूर निघतो? ही समस्या का उद्भवते याची कारणे जाणून घ्या आणि वेळीच सावध व्हा

सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचे तोटे

अनिश्चितता – सेकंड हॅन्ड कार जेव्हा तुम्ही खरेदी करण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला त्या कारविषयी सांगितलेली माहिती आणि तिची वास्तविक स्थिती यात फरक असू शकतो, जे तुमच्यासाठी मोठे नुकसान ठरू शकते.

देखरेख महाग – नवीन कारपेक्षा सेकंड हॅन्ड कारची देखरेख अधिक महाग ठरू शकते. जुन्या वाहनांमध्ये अनेक प्रकारचे दोष असू शकतात.

कमी सुरक्षा – नवीन कार खरेदी करताना त्यात नवीन सेफ्टी फीचर्स मिळू शकतात जे तुम्ही सेकंड हॅन्ड कार खरेदी करताना मिस करू शकता.

कमी वॉरंटी – जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा कंपनीकडून वॉरंटी मिळते, पण तुम्ही जेव्हा सेकंड हॅन्ड कार खरेदी करता तेव्हा तुम्हाला वॉरंटी मिळत नाही.