पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिक इलेक्ट्रिक कार्सना पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक कार्स या इंधनावर चालणाऱ्या वाहनांसारखे वायू सोडत नाही. त्यामुळे, या कार्स पर्यावरणपूरक ठरतात. मात्र, मायलेज आणि किंमतीच्या बाबतीत त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होत असतात. अशात चीनची कंपनी बीवायडी ही भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. ११ ऑक्टोबरला लाँच होणाऱ्या या कारची किंमत २५ ते ३५ लाखांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कारचे मायलेज दमदार आहे.
इतका मायलेज देते
एटीटीओ ३ असे या कारचे नाव असून बीवायडी पुढील महिन्याच्या ११ तारखेला ही कार भारतीय बाजारात लाँच करणार आहे. ही कार ४.५ मीटर लांब आहे. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या राईट हँड ड्राइव्ह मार्केटमध्ये ही कार आधीच लाँच झाली आहे. Atto 3 SKD (सेमी-नॉक डाउन) असेंब्ली मार्गाने भारतात येईल. या कारची रेंज 480 किलोमीटर पर्यंत असेल. या कारची डिल्हीवरी पुढल्या वर्षीच्या सुरुवातीपासून होण्याची शक्यता आहे.
(Petrol-Diesel Price on 8 September 2022: इंधनाच्या किमतींमध्ये आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर)
या ठिकाणी होणार असेंबल
एटीटीओ ३ सुरुवातील चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर प्लांटमध्ये असेंबल केली जाईल. पुढील दोन वर्षांत कंपनी कारचे 10 हजार युनिट्स एकत्र करून भारतीय बाजारपेठेत विकणार आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर कंपनी आपले स्थानिक उत्पादन युनिट स्थापन करण्याचा विचार करू शकते.
हे आहेत फिचर्स
एटीटीओ ३ दोन स्वतंत्र बॅटरी पॅकसह विकली जाते. कारमध्ये 49.92 किंवा 60.48 केडब्ल्यूएचचा बॅटरी पॅक मिळतो, जो 204 पीएस ची कमाल पॉवर आणि 310 एनएम चा पीक टॉर्क जनरेट करतो. एनइडीसी मानकांनुसार, 60.48 केडब्ल्यूएच बॅटरी पॅकसह कार 480 km चालते. Atto 3 फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडते.
(Top 3 Best Selling SUVs August 2022: ऑगस्टमध्ये या टॉप ३ SUV ला लोकांची पसंती)
सुरक्षेसाठी हे फिचर्स
सेफ्टीसाठी कारमध्ये एडीएएस, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट आणि रीअर कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक ब्रेक सारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षा किटमध्ये फ्रंट, साइड आणि कार्टेन एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि हिल डिसेंट कंट्रोल यांचाही समावेश आहे.
कारमध्ये स्लीक हेडलॅम्प्स, क्लोज-ऑफ ग्रिल, फंकी अलॉय व्हील्स, क्रोम-लाइन असलेल्या खिडक्या, स्लोपिंग रूफलाइन आणि कनेक्टेड टेल लॅम्प्ससह आहेत, ज्यामुळे कारला स्पोर्टी लूक मिळतो. इतर वैशिष्ट्यांमध्ये पॅनोरामिक सनरूफ, इलेक्ट्रिक अनलॉक टेलगेट, रूफ रेल, अॅडजस्टेबल ओआरव्हीएम यांचा समावेश आहे.
असे आहे इंटीरियर
कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, कारमध्ये 12.8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 5 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, इलेक्ट्रिक पॉवर असिस्टेड स्टीयरिंग व्हील, 8 स्पीकरसह प्रीमियम डायरॅक एचडी ऑडिओ सिस्टम, यूएसबी सी आणि यूएसबी ए पोर्ट, सिंथेटिक लेदर सीट, ड्रायव्हर आणि समोरच्या प्रवाशासाठी हीट सीट आणि व्हॉइस कमांड यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
(‘Hyundai Venue N Line’ कार भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये)