BYD Sealion 7 Price And Features : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक कार्सना पसंती देत आहेत. चीनची कंपनी बीवायडीने (BYD) भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार बीवायडी सीलियन ७ (BYD Sealion 7) लाँच केली आहे. सीलियन ७, पूर्वी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि कंपनीला एका महिन्यात हजारपेक्षा जास्त बुकिंग प्राप्त झाले आहेत. तर या गाडीचे फीचर्स, व्हेरिएंट आणि किमतीबद्दल या बातमीतून सविस्तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पेक्स आणि किंमत –

बीवायडी सीलियन ७ प्रीमियम आणि परफॉर्मन्स या दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. दोन्ही गाड्यांना ८२.५६ किलोवॅट प्रति तास कॅपेसिटीची बॅटरी दिली आहे. पण, बीवायडी सीलियन ७ प्रीमियममध्ये मागील एक्सलवर आधारित एकच मोटर सेट आहे, त्यामुळे BYD Sealion 7 प्रीमियम 309 bhp आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. BYD नुसार, बीवायडी सीलियन ७ प्रीमियम ६.७ सेकंदात ० ते १०० किलोमीटरचा स्पीड गाठू शकते आणि एका चार्जवर ही कार ५६७ किलोमीटरची रेंज देते. BYD Sealion 7 परफॉर्मन्स ड्युअल मोटर पॅक्ड ऑल-व्हील-ड्राइव्ह ट्रिम ४.५ सेकंदात ० ते १०० किलोमीटरचा स्पीड गाठू शकते आणि एका चार्जवर ही कार ५४२ किलोमीटरची रेंज देते. हे 523 bhp आणि 690 Nm टॉर्क जनरेट करते.

फीचर्स :

इतर कंपन्यांच्या इव्हीप्रमाणे बीवायडी सीलियन ७ मध्ये १५.६ इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, नापा लेदर सीट्स, १२८ कलर अँबियंट लाइट्सचे पर्याय, इलेक्ट्रिक सनशेडसह पॅनोरॅमिक सनरूफ, हेड्स-अप ड्रायव्हर डिस्प्ले, ६ वे पॉवर्ड फ्रंट पॅसेंजर सीट तर ड्रायव्हर सीट ला ४ वे lumbar फंक्शन आदी फीचर्स दिले आहेत. डायनॉडिओ स्पीकर, 50 W वायरलेस फोन चार्जर आणि गाडी लोड टू लोड फंक्शनसह सुसज्ज आहे. तसेच गाडीला ११ एअरबॅग्ज, ड्रायव्हरचा थकवा घालवण्यासाठी मॉनिटरिंग, ३६० डिग्री कॅमेरा, ऑटो होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 ADAS सूट दिला जात आहे.

BYD Sealion 7 प्रीमियम व्हेरिएंटची किंमत ४८,९०,००० तर BYD Sealion 7 पर्फोमन्सची किंमत ५४,९०,०० रुपये आहे. लाँचिंगनंतर, या कारची डिलिव्हरी आता मार्चपासून सुरू होईल. विशेष म्हणजे बुकिंग सुरू झाल्यापासून आतापर्यंत या कारला एक हजार बुकिंग मिळाले आहेत. BYD Sealion 7 सेगमेंटमध्ये, Hyundai Ioniq5, Kia EV6, BMW iX7 सारख्या इलेक्ट्रिक SUV शी स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byd launched sealion 7 launched in india available in premium and performance two trims check out price and features asp