BYD Seal Offers Discounts On Electric Car : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रचंड मागणी आहे. अशा परिस्थितीत विदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक भारतात आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत, यामुळे आता चिनी कार निर्माता BYD (Build Your Dreams) कंपनी ग्राहकांसाठी काहीतरी खास घेऊन आली आहे. BYD इंडिया या वर्षी मार्चमध्ये लाँच झालेल्या त्यांच्या प्रमुख इलेक्ट्रिक वाहनांवर दिवाळीनिमित्त सूट (BYD Seal offers) देत आहे. काय असणार ही ऑफर चला जाणून घेऊ…

BYD इंडियाने या वर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आलेल्या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन, ‘सील’वर (Seal) सवलती सादर (BYD Seal offers) केल्या आहेत. ऑफरशिवाय या कारची किंमत ४१ लाख रुपयांपासून सुरू होत आहे. सील डायनॅमिक, प्रीमियम आणि परफॉर्मन्स या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच कंपनी या सेलमध्ये (BYD Seal offers) तुम्हाला २.५ लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे.

१. सील परफॉर्मन्स (Seal Performance)

टॉप-ऑफ-द-लाइन सीलच्या व्हेरिएंट परफॉर्मन्सची किंमत ५३ लाख रुपये आहे. स्पोर्टी लूक असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाचा जे शोध घेत आहेत, त्यांना हा व्हेरिएंट कंपनी दोन लाख रुपयांच्या सवलतीसह देत आहे. त्याचबरोबर तुम्हाला तीन वर्षांची सर्व्हिस आणि मेन्टेनन्स पॅकेज दिले जाणार आहे, ज्याची किंमत ५०,००० रुपये आहे. म्हणजे तुम्हाला तीन वर्षांपर्यंत वाहनाची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. परफॉर्मन्स व्हेरिएंटमध्ये एक ऑल-व्हील ड्राईव्हट्रेन आहे, ज्यामध्ये प्रत्येक एक्सलवर ड्युअल मोटर्स आहेत. इलेक्ट्रिक कार ५२३ बीएचपी (523 bhp) आणि ६७० एनएम (670 Nm) टॉर्क जनरेट करते. BYD नुसार ही कार ३.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.. शीर्ष मॉडेल ५८ किमी (NEDC) पर्यंतच्या रेंजसह 82.56 kWh बॅटरीच्या क्षमतेसह येते.

हेही वाचा…Toyota Taisor Offers Accessories : वेलकम डोअर लॅम्पसह मोफत मिळणार २० हजार रुपयांच्या ॲक्सेसरीज, पाहा लिमिटेड एडिशनची किंमत

२. सील प्रीमियम (Seal Premium)

सील प्रीमियमची किंमत ४५.५५ लाख रुपये आहे. पण, या सेलमध्ये तुम्हाला मिड-रेंज सील प्रीमियमवर एक लाख रुपयांपर्यंतची ऑफर देत आहे. यामध्ये ५० हजार रुपयांचे डिस्काउंट, तीन वर्षांची सर्व्हिस आणि मेन्टेनन्स पॅकेजचा समावेश आहे. सील प्रीमियम एक रियर-व्हील-ड्राइव्ह ईव्ही आहे आणि यात तुम्हाला ८२.५६ kWh बॅटरी मिळते. याचे आउटपूट 308 bhp आणि 360 Nm टॉर्क जनरेट करते आणि ६८० किमीपर्यंतची ड्राइव्ह रेंज ऑफर करते.

BYD च्या सेल व्हेरिएंटपैकी एक म्हणजे डायनॅमिक. तर डायनॅमिक या व्हेरिएंटवर कोणतीही ऑफर किंवा सवलत देण्यात आलेली नाही, त्यामुळे जर तुम्हाला डायनॅमिक व्हेरिएंट खरेदी करायची असेल, तर त्याची किंमत ४१ लाख रुपयेआहे.